NEET UG 2024 साठी अर्ज प्रक्रिया सुरू 

 NTA  ने दिलेल्या माहिती नुसार NEET UG परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज 09 मार्च 2024 पर्यंत स्वीकारले जातील.

NEET UG 2024 साठी अर्ज प्रक्रिया सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अंडरग्रेजुएट (NEET UG 2024) साठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासोबतच NTA ने वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी माहिती बुलेटिन, अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न आणि इतर महत्त्वाचे तपशील देखील प्रसिध्द केले आहे. 

 NTA  ने दिलेल्या माहिती नुसार NEET UG परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज 09 मार्च 2024 पर्यंत स्वीकारले जातील. https://neet.ntaonline.in/frontend/web/site/login येथे अर्ज भरता येतील. यानंतर, परीक्षा फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्यासाठी दुरुस्ती विंडो उघडली जाईल. 

NEET UG परीक्षा 5 मे रोजी होणार आहे. तर निकाल 14 जून रोजी जारी केला जाईल. NEET UG परीक्षा शुल्कात यावेळी कोणताही बदल झालेला नाही. परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य/एनआरआय उमेदवारांसाठी 1 हजार 700 रुपये शुल्क आणि EWS/OBC-NCL उमेदवारांसाठी शुल्क 1600 रुपये निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय, SC/ST/PWD/तृतीय लिंग उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावे लागेल.


परीक्षेसाठी भारतातील एकूण परीक्षा शहरांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. याअंतर्गत आता 499 ऐवजी 554 शहरांमध्ये परीक्षा होणार आहे. NEET UG 2024 परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांच्या आवडीची कोणतीही चार शहरे निवडण्याची संधी मिळेल.