कंत्राटी पदांच्या भरतीतही दिव्यांगांना आरक्षण; राज्य सरकारचे आदेश

दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांगांच्या दारी अभियानादरम्यान दिव्यांग आरक्षणाची अंमलबजावणी होत नसल्याबाबत बऱ्याच तक्रारी प्राप्त होत असल्याचे या विभागाच्या सचिवांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले.

कंत्राटी पदांच्या भरतीतही दिव्यांगांना आरक्षण; राज्य सरकारचे आदेश
Disability Welfare Department

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ प्रमाणे दिव्यांगांना नोकरीत चार टक्के आरक्षण (Disability Reservation) मिळते. मात्र, दिव्यांग आरक्षणाची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याअनुषंगाने दिव्यांग कल्याण विभागाने (Disability Welfare Department) परिपत्रक जारी करत कंत्राटी पदांसाठीही दिव्यांगांसाठी आरक्षण देण्याचे आदेश काढले आहेत.

 

दिव्यांग कल्याण विभागाची मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांगांच्या दारी अभियानादरम्यान दिव्यांग आरक्षणाची अंमलबजावणी होत नसल्याबाबत बऱ्याच तक्रारी प्राप्त होत असल्याचे या विभागाच्या सचिवांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. याअनुषंगाने बैठकीमध्ये मुख्य सचिवांनी कंत्राटी पदांनाही दिव्यांग आरक्षण लागू होते की कसे याबाबत निश्चित अभिप्राय सर्व विभागांना कळवावे, असे आदेशित केले आहे.

महाज्योतीच्या निकालात गोंधळ; गुणपत्रिका संकेतस्थळावरून हटवली, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

 

दिव्यांग हक्क अधिनियम २०२६ च्या कलम ३३ प्रमाणे दिव्यांगांसाठी सुयोग्य पदांची ओळख समुचित शासनांनी करावी, असे नमूद आहे. नोकरीच्या संदर्भात सदर श्रेणीतील लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींकडून भरली जाऊ शकतील, अशी आस्थापनांमधील पदे नक्की करून कलम ३४ मधील तरतूदींप्रमाणे राखीव ठेवावीत, असे त्यात म्हटले आहे.

 

अधिनियमाच्या कलम तीन मधील नमूद समुचित शासन म्हणजे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या कलम २ (ब) प्रमाणे नमूद असेल. कलम ३४ प्रमाणे समुचित शासनाने प्रत्येक शासकीय आस्थापनेत प्रत्येक गटातील, त्या श्रेणीतील एकूण पदांच्या निदान चार टक्के पदे तरी लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती नेमूनच भरावीत, असे नमूद आहे.

 

शासनाची अनेक पदे कंत्राटी तत्वावर भरावयाची असून त्यांचे वेतन संबंधित शासन विभागाने द्यावयाचे असल्याने कंत्राटी पदांसाठी आवश्यक कार्यवाही करून संबंधित विभागाने त्याप्रमाणे दिव्यांगांसाठी पदे आरक्षित करणे आवश्यक आहे, असे दिव्यांग कल्याण विभागाने जारी केलेल्या परिपत्रका स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO