तलाठी भरती प्रक्रिया अडचणीत ? न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दाखल केलेल्या याचिकेवर नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली. चार आठवड्यात उत्तर द्या..

तलाठी भरती  प्रक्रिया अडचणीत  ? न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या तलाठी भरती परीक्षेतील (Talathi Recruitment Exam) मोठी आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट (big and very important update) समोर आली आहे. एका बाजूला निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू आहे. त्यानंतर संबंधित उमेदवारांना तलाठी पदाची नियुक्तिपत्रे वाटप होणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला या प्रकरणात राज्य सरकारला नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली (Nagpur bench issued notice) आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी प्रकरणात ही नोटीस देण्यात आली आहे. यावर राज्य सरकारला (State Government) उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देखील देण्यात आली आहे. तलाठी भरती गैरप्रकारांचा तपास विशेष तपास पथकामार्फत निष्पक्षपणे  करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली. त्यामुळे निवड यादी जाहीर झाल्यातर तलाठी भरती अडचणीत तर येणार नाही ना? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी ५ जानेवारी रोजी रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर भरतीचा पुढील टप्पा म्हणून २३ जानेवारी रोजी रात्री उशिरा निवड यादी प्रसिद्ध झाली.  यामध्ये राज्यातील २३ जिल्ह्यांमधील निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समितीने तयार केल्या आहेत. जानेवारी महिन्यात भूमी अभिलेख विभागाकडून उमेदवारांची निवड आणि प्रतिक्षायादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर संबंधित उमेदवारांना तलाठी पदाची नियुक्तिपत्रे वाटप होणार आहेत. 

तलाठी भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासली जात असताना दुसरीकडे आता न्यायालयाने राज्य समन्वयक आणि महसूल विभागाला नोटीस बजावून चार आठवड्यात जबाब नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यात ५७ सत्रांमध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसह राजकीय संघटनांनी केला होता. त्यामुळे तलाठी भरती वादाच्या कचाट्यात सापडणार का ? हे पाहाणे महत्ताचे ठरणार आहे.