मेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची सक्ती करू शकत नाहीत 

 पदव्युत्तर विद्यार्थ्यांना योग्य निवासी निवास व्यवस्था प्रदान करणे.  महाविद्यालयासाठी  बंधनकारक असेल. मात्र, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची सक्ती करता येणार नाही.

मेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची सक्ती करू शकत नाहीत 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

वैद्यकीय महाविद्यालये (Medical colleges)पदव्युत्तर विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची सक्ती (Forced to live in a hostel) करू शकत नाहीत, असे निर्देश राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) वैद्यकीय महाविद्यालयांना दिले आहेत. या संदर्भात NMC ने वैद्यकीय महाविद्यालयांना  नोटीस बजावली आहे. NMC  ने आपल्या नोटीसीत म्हटले आहे की, " विद्यार्थ्यांना वसतिगृह देणे बंधनकारक आहे, परंतु, महाविद्यालये ही विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची सक्ती करू शकत नाहीत.

“पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन रेग्युलेशन (पीजीएमईआर), 2023 च्या नियम 5.6 नुसार,  पदव्युत्तर विद्यार्थ्यांना योग्य निवासी निवास व्यवस्था प्रदान करणे.  महाविद्यालयासाठी  बंधनकारक असेल. मात्र, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची सक्ती करता येणार नाही." 

यापूर्वीच्या पीजी वैद्यकीय नियमांमध्येही अशी तरतूद नव्हती, असेही कौनसीलने स्पष्ट केले आहे. काही वैद्यकीय महाविद्यालये/संस्था विद्यार्थ्यांवर संस्थेच्या वसतिगृहात राहण्याची सक्ती करतात, अशा तक्रारी पीजी विद्यार्थ्यांकडून आयोगाला प्राप्त झाल्या आहेत. महाविद्यालयांनी या नियमांचे पालन केले नाही तर त्यांना आर्थिक दंडासह विविध दंडांना सामोरे जावे लागेल, असा इशारा NMC ने दिला आहे. NMC ने आपल्या नोटोसित म्हटले आहे की, "सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्थांना वरील नियमांची दखल घ्यावी. या नियमांची अंमलबजावणी झाली नाही तर  NMC PGMER, 2023 च्या नियमन 9.1 आणि 9.2 नुसार कारवाई करू शकते. ज्यामध्ये आर्थिक दंड, जागा कमी करणे, प्रवेश थांबवणे इत्यादींचा समावेश असू शकतो."