कर्तव्य पथावर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांचा डंका ; अनुष्का साठे, अबु तांबोळी, तुषार अडसूळ यांना संधी

कर्तव्य पथावर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांचा डंका ; अनुष्का साठे, अबु तांबोळी, तुषार अडसूळ यांना संधी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या (Pune District Education Association) बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेची छात्र अनुष्का सचिन साठे ( Anushka Sathe) हिची तर अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील एनसीसी २ महाराष्ट्र बटालियनमधील गोल्डन एसयुओ अबु तांबोळी (Abu Tamboli) व गोल्डन एसयुओ तुषार अडसूळ (Tushar Adsul) या छात्र सैनिकांची दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी (२०२४) कर्तव्य पथावर (राजपथ- Rajpath) होणाऱ्या संचलनासाठी निवड झाली आहे.त्यामुळे यंदा कर्तव्य पथावर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांचा डंका असणार आहे. 

महाराष्ट्रातून १२२ कॅडेटची या संचलनासाठी निवड झाली असून त्यात पुणे ग्रुप मधून २९ कॅडेटची निवड झाली आहे. त्यामध्ये २ महाराष्ट्र बटालियनचे १५ कॅडेटची निवड झाली आहे. यात  अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपुर, मुंबई अ, मुंबई ब आणि पुणे यांचा समावेश असतो. यात कु.अनुष्का सचिन साठे ही बाबुरावजी घोलप महाविद्यालयाची व २ महाराष्ट्र बटालियन एनसीसी ची छात्र आहे. तिने तीन महिन्यांच्या मेहनतीत दहा दिवसांचे एक शिबीर असे दहा शिबिरे पूर्ण केले आहे.

हेही वाचा : IAF अग्निवीरवायू भरती झाली सुरू ; अर्ज भरा या तारखेपासून
 
 अबु तांबोळी व तुषार अडसूळ यांचे  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) एम.जाधव,  तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी कॅप्टन डॉ.धिरज देशमुख,सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.
 
 कर्तव्य पथ (राजपथ) दिल्ली येथे होणाऱ्या संचलनासाठी मला संधी मिळणे हे माझ्यासह कुटुंबीयांसाठी गौरवाची बाब आहे, खूप सरावानंतर ही संधी मला मिळाली आहे, त्यामुळे माझे व माझ्या घरच्यांचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे छात्र कु. अनुष्का सचिन साठे हिने सांगितले.