IAF अग्निवीरवायू भरती झाली सुरू ; अर्ज भरा या तारखेपासून 

नोंदणी प्रक्रिया येत्या १७ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

IAF अग्निवीरवायू भरती झाली सुरू ; अर्ज भरा या तारखेपासून 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारतीय वायुसेनेने IAF अग्निवीरवायू भरती प्रक्रिया सुरू झाली असून नोंदणी प्रक्रिया येत्या १७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर इच्छुकांना येत्या  ६ फेब्रुवारीपर्यंत  अर्ज करता येणार आहेत. पात्र उमेदवार agnipathvayu.cdac.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. या पदासाठीच्या ऑनलाइन परीक्षा येत्या १७ मार्चपासून घेतल्या जाणार आहेत.

विज्ञान शाखेतील उमेदवारांनी केंद्रीय, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाद्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळांमधून गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांसह इयत्ता बारावी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.  त्यांना  परीक्षेत एकूण किमान ५० टक्के आणि इंग्रजीमध्ये ५० टक्के  गुण असावेत. तसेच उमेदवारांचा जन्म २ जानेवारी २००४ ते २ जुलै २००७ दरम्यान झालेला असावा. उमेदवार निवड प्रक्रियेचे सर्व टप्पे पार करत असल्यास, नाव नोंदणीच्या तारखेनुसार उच्च वयोमर्यादा २१ वर्षे असावी. निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षेचा समावेश होतो.  फेज १ आणि फेज २ च्या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल.

हेही वाचा : जेईई परीक्षेचे नियम झाले आणखी कडक

परीक्षेसाठी नोंदणी करताना उमेदवारांना ५५० रुपये + GST ऑनलाइन परीक्षा शुल्क भरावे लागेल. डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंगद्वारे पेमेंट गेटवेद्वारे पेमेंट केले जाऊ शकते.