शिक्षक भरतीसाठी आणखी एका आठवड्याची प्रतीक्षा;  शिक्षण आयुक्त सूरज मांढरे

शिक्षक पदभरती, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, पवित्र पोर्टल नोंदणी, शिक्षक भरती जाहीरात

शिक्षक भरतीसाठी आणखी एका आठवड्याची प्रतीक्षा;  शिक्षण आयुक्त सूरज मांढरे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील शिक्षक पदभरतीच्या (Teacher recruitment) प्रतिक्षेत असलेल्या आणि पवित्र पोर्टलवर (Pavitra Portal Registration) नोंदणी झालेल्या पात्र उमेदवारांची भरतीची प्रक्रिया या आठवड्याच्या शेवटपर्यंत पुर्ण होणार आहे. त्यानंतर अंतिम झालेल्या जाहिराती मुलाखतीशिवाय पदभराती व मुलाखातीसह भरती या प्रकारात पाहावयास मिळतील, अशी माहिती राज्याची शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी परिपत्रकाद्वारे दिली.

बहुप्रतीक्षित शिक्षक भरातीबाबत पात्र उमेदवारांमध्ये उत्कंठा आहे. पवित्र पोर्टलावर जाहिराती केव्हा प्रसिध्द होणार याची उमेदवार वाट पाहत आहेत. याबाबत शिक्षण विभागाकडून विविध पातळ्यांवर काम केले जात आहे. नुकतीच व्हिडीओ काॅन्फसन्सद्वारे याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. मात्र,अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना आणखी एक आठवडा प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शिक्षण विभागातर्फे भरातीबाबत प्रसिध्दी पत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यात तसेच सेमी इंग्रजीसाठी डी.एड. इंग्रजी माध्यमातून घेण्याबाबत तरतूद आहे. त्याचप्रमाणे इ. ६ वी ते इ. ८ वी गटातील पदांसाठी व्यावसायिक अर्हता डी.एड सह बी.एड अर्हता धारण करणारे उमेदवार पात्र असल्याचे  स्पष्ट करण्यात आले आहे. 

शिक्षक पदभरतीसाठी दिनांक २२/०१/२०२४ पर्यंत पवित्र पोर्टलवर नोंदणी करुन आरक्षण विषयक माहिती नोंद केलेल्या व्यवस्थापनांना जाहिराती अंतिम करण्यास दिनांक २४/०१/२०२४ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर शासनाने दिनांक २५/०५/२०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजीसाठी आवश्यक पदे भरण्याबाबत तसेच शासन निर्णय दि. १३/१०/२०२३ नुसार साधन व्यक्तींसाठीचे रिक्त पदे राखून ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बदल करण्यास दिनांक ३०/०१/२०२४ पर्यंत कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आला होत्या.

दोन्ही प्रकारच्या जाहिरातीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आज दिनांक ३१/०१/ ३०२४ रोजी व्हिडीओ काॅन्फरन्स घेवून आढावा घेण्यात आला. त्यातील मुलाखतीसह पदभरतीच्या खाजगी संस्थांच्या जाहिरातीमध्ये दुरुस्त्या होत्या. त्यादेखील पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जाहिरातीची त्यांच्या स्तरावरील कार्यवाही दि. ०२/०२/२०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,असेही प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.