IIMC ला डीम्ड युनिव्हर्सिटी'चा दर्जा ; महाराष्ट्रातील या केंद्राचा समावेश 

महाराष्टातील अमरावती येथील IIMC केंद्राचा यात समावेश आहे.

IIMC ला डीम्ड युनिव्हर्सिटी'चा दर्जा ; महाराष्ट्रातील या केंद्राचा समावेश 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनला (IIMC) 'डीम्ड युनिव्हर्सिटी'चा दर्जा दिला आहे. संस्थेने आपल्या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर ही बातमी शेअर केली आहे. यामध्ये IIMC च्या महाराष्टातील अमरावती येथील केंद्राचा ही समावेश आहे.

या नवीन दर्जासह, संस्थेला आता डॉक्टरेटसह पदवी प्रदान करण्यासाठी अधिकृत मान्यता ही देण्यात आली आहे.   IIMC  नवी दिल्ली आणि त्याच्या पाच प्रादेशिक केंद्रांना डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये अमरावती (महाराष्ट्र), जम्मू (जम्मू आणि काश्मीर),  ऐझॉल (मिझोरम), कोट्टायम (केरळ) आणि ढेंकनाल (ओडिशा) येथे असलेल्या पाच केंद्राचा समावेश आहे. 

दरम्यान, संस्थेने आपल्या  पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आयआयएमसी जनसंवादात शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी सर्वोत्तम देण्यासाठी वचनबद्ध आहे."