स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मोफत अध्यापनाचे धडे 

दिलीपराव देशमुख स्पर्धा परीक्षा केंद्राकडून हा उपक्रम राबवला जाणार आहे. 

स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मोफत अध्यापनाचे धडे 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सरकारी नोकरी मिळावी म्हणून अनेक विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची (Competitive Examination) तयारी करताना दिसत आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी राहून आव्वाच्या सव्वा शुल्क मोजून कोचिंग क्लासेस (Coaching classes) लावले जात आहेत. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे हे शक्य होणार नाही आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी लातूरमध्ये मोफत अध्यापनाचे धडे (Free Tutoring Lessons in Latur) दिले जाणार आहेत. लातूर शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हा धागा पकडून दिलीपराव देशमुख स्पर्धा परीक्षा केंद्राकडून (Diliprao Deshmukh Competitive Examination Centre) हा उपक्रम राबवला जाणार आहे. 

गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून  रेणा साखर कारखान्याच्या पुढाकारातून लातुर शहरात हे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले आहे.ग्रामीण, शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा सारख्या शिक्षणाची सोय आपल्या भागातच उपलब्ध व्हावी याकरिता आमदार धिरज देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर येथील सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय परिसरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय नि:शुल्क सुरू करण्यात आले आहे.

एमपीएससी कम्बाईन व सरळसेवा ऑनलाईन परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४५ दिवसांचा क्रॅश कोर्स १३ मे पासून सुरू होत आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परीक्षा केंद्राकडून करण्यात आले आहे आहे.

विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव स्पर्धा परीक्षा केंद्राची दुसरी शाखा लातूर येथे श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय परिसरात सुरू करण्यात आली आहे. एमपीएससी, राज्यसेवा, पीएसआय एसटीआय/ एएसओ बँकिंग, सरळसेवीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बॅचेस आहेत. प्रत्येक बॅचचे नियमित ऑनलाईन व ऑफलाइन लेक्चर्स, निवड झालेल्या अधिकाऱ्यांशी संवाद, डिजिटल अभ्यासिका व सर्व पुस्तके उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती माहिती देण्यात आली आहे.