CBSE 10th result : बारावीनंतर दहावीचा निकालही झाला जाहीर

सीबीएसई बोर्डाने बारावी पाठोपाठ इयता दहावीचा निकालही जाहीर केला आहे.

CBSE 10th result : बारावीनंतर दहावीचा निकालही  झाला जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज वरिष्ठ माध्यमिक (12वी) वर्गाचा निकाल जाहीर केल्यानंतर आता माध्यमिक (10वी) वर्गाचा निकालही जाहीर केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, आता विद्यार्थी CBSE ची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, DigiLocker चे ॲप आणि पोर्टल results.digilocker.gov.in किंवा एसएमएसद्वारे आपला निकाल पाहू शकतात. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, शाळा क्रमांक, प्रवेशपत्र ओळखपत्र टाकावे लागेल.

विद्यार्थी त्यांच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या डिजिटल प्रती भारत सरकारच्या डिजीलॉकर पोर्टलवरून डाउनलोड करू शकतील.. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा आधार क्रमांक देऊन या पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.CBSE बोर्ड दहावीचा निकाल 2024 अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, cbse.nic.inresults.cbse.nic.in आणि cbseresults.nic.in वर पाहता येईल.

CBSE बोर्डाच्या दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.75 इतकी आहे. तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.७१ टक्के आहे. यंदा दहावीचा निकाल 93.60 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल चांगला लागला आहे. यावर्षी त्रिवेंद्रमने देशातील सर्वोत्तम कामगिरी केली असून येथील 99.75 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

4 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण 


CBSE 10 वी परीक्षेत यंदा 4 लाख 7 हजार, 283  विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. यावर्षी 10 वी साठी एकूण 22.51 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 21.38 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.  CBSE 10 वी परीक्षेत नवोदय विद्यालये आणि केंद्रीय विद्यालयांचा निकाल ९९.०९ लागला आहे.