कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांचा कार्यकाल संपुष्टात ; डॉ.विजय खरे यांच्याकडे पदभार 

विद्यापीठाच्या अंतराष्ट्रीय केंद्राचे संचालक व संरक्षण व सामरीकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.विजय खरे यांच्याकडे प्रभारी कुलसचिव पदाचा पदभार सुपूर्द करण्यात आला आहे.

कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांचा कार्यकाल संपुष्टात ; डॉ.विजय खरे यांच्याकडे पदभार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार (Dr. Prafull Pawar, Registrar of Savitribai Phule Pune University) यांचा पाच वर्षांचा कार्यकाल संपुष्टात आला असून विद्यापीठाच्या अंतराष्ट्रीय केंद्राचे संचालक  (International Center Director) व संरक्षण व सामरीकशास्त्र विभागाचे (Department of Defence and Strategic Studies ) प्रमुख डॉ.विजय खरे (Dr. Vijay Khare ) यांच्याकडे प्रभारी कुलसचिव पदाचा पदभार सुपूर्द करण्यात आला आहे. खरे यांनी १५ नोव्हेंबर पासून पदभार स्वीकारला. पूर्णवेळ कुलसचिव निवडीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि पुढील आदेश तोपर्यंत होईपर्यंत खरे यांच्याकडे प्रभारी कुलसचिव पदाची जबाबदारी राहणार आहे.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाल १२ नोव्हेंबर रोजी पूर्ण केला. त्यामुळे त्यांना या पदावरून मुक्त करण्यात आले आहे. पवार हे विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विभागात (पुम्बा) प्राध्यापक म्हणून कार्यरत  होते.कुलसचिव पदावरून कार्यामुक्त झाल्यावर ते पुम्बा येथे रुजू होणार आहेत.त्यामुळे सध्या विद्यापीठाचा कुलसचिव पदाची  जबाबदारी डॉ.विजय खरे यांच्याकडे असणार आहे.

हेही वाचा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया वादात ? पुण्यातील पाच उमेदावर शर्यतीत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदाच्या भरतीस मान्यता मिळावी याबाबतचा प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनातर्फे शासनाकडे सादर करण्यात आला आहे.विद्यापीठातर्फे जाहिरात प्रसिध्द करून पूर्णवेळ कुलसचिवांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रभारी कुलसचिव म्हणूनच खरे यांना काम पहावे लागणार आहे.गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठात विद्यार्थी संघटनांच्या वादातून निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे विद्यापीठाच्या प्रशासनाची धुरा खंबीरपणे सांभाळणाऱ्या व्यक्तीची निवड होणे गराजेचे आहे.त्यामुळे खरे हे पुढील काही महिने प्रशासन कसे चालवतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
--------------------