भारतीय भाषांमध्ये तीन वर्षात अभ्यास साहित्य उपलब्ध करा ; शिक्षण विभागाचे निर्देश

अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी , यूजी, पीजी आणि स्किल्सची पुस्तके ‘अनुवादिनी’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲपद्वारे अनुवादित केली जात असल्याचे मंत्रालयाने सांगितले,

भारतीय भाषांमध्ये तीन वर्षात अभ्यास साहित्य उपलब्ध करा ; शिक्षण विभागाचे निर्देश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यार्थ्यांना त्यांच्याच भाषेत शिक्षण घेण्याची संधी मिळावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेतून डिजिटल पद्धतीने अभ्यास साहित्य उपलब्ध (Study material available digitally) करून द्यावे, या उद्देशाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (By the Union Ministry of Education) देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांना महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत. मंत्रालयाने सर्व शालेय आणि उच्च शिक्षण (School and Higher Education) नियामक जसे की UGC, AICTE, NCERT, NIOS, IGNOU आणि IITs, CUs आणि NIT च्या प्रमुखांना पुढील तीन वर्षांत सर्व अभ्यासक्रमांसाठी भारतीय भाषांमध्ये अभ्यास साहित्य (Study material in Indian languages) उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.

अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी , यूजी, पीजी आणि स्किल्सची पुस्तके ‘अनुवादिनी’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲपद्वारे अनुवादित केली जात असल्याचे मंत्रालयाने सांगितले, गेल्या दोन वर्षांत सरकार या दिशेने काम करत आहे. ही पुस्तके eKumbh पोर्टलवर उपलब्ध आहेत. शालेय परिसंस्थेमध्ये दिक्षावरील ३० हून अधिक भाषांसह अनेक भारतीय भाषांमध्ये अभ्यास साहित्य उपलब्ध आहे. JEE, NEET, CUET सारख्या स्पर्धात्मक परीक्षा १३ भारतीय भाषांमध्ये घेतल्या जात आहेत.

हेही वाचा : एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेच्या निकालाच्या तारखा जाहीर

शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, " राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) शिफारशींमधून शिक्षणामध्ये बहुभाषिकतेला प्रत्येक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी या शिफारशी आल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या भाषेत अभ्यास करण्याची संधी मिळेल आणि चांगले शिक्षण परिणाम मिळतील.  स्वतःच्या भाषेत अभ्यास केल्याने विद्यार्थ्याला कोणत्याही भाषिक अडथळ्याशिवाय नाविन्यपूर्ण विचार करण्याची नैसर्गिक संधी उपलब्ध होऊ शकते, असे त्यात नमूद केले आहे.