वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरु पदाची निवड प्रक्रिया सुरू

कुलगुरू पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ असावी.

वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरु पदाची निवड प्रक्रिया सुरू
Mahatma Gandhi International Hindi Central University Wardha

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

Advertisement For The Post Of vice Chancellor : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी केंद्रीय विद्यापीठाच्या (Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwavidyalaya, Wardha) कुलगुरू (vice chancellor) पदासाठी शिक्षण मंत्रालयाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून शिक्षण मंत्रालयाने अर्ज मागवले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत कुलगुरु पदासाठी अर्ज सादर करावा लागणार आहे. 

शैक्षणिक पात्रता : कुलगुरू पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ असावी. विद्यापीठात प्राध्यापक म्हणून किमान दहा वर्षांचा अनुभव, प्रतिष्ठित संशोधन किंवा शैक्षणिक प्रशासकीय संस्थेतील अनुभव असणे आवश्यत आहे. शैक्षणिक नेतृत्व दाखविल्याच्या पुरावाही आवश्यक आहे.  

या पदासाठी ६५ वर्ष वयोमर्यादा आहे. पगार आणि सेवा शर्ती वेतन 2,10,000, भत्ता रु. 11,250 आणि इतर नेहमीचे भत्ते. सेवांच्या अटी व शर्ती या कायद्यात नमूद केल्याप्रमाणे असतील, विद्यापीठाचे कायदे आणि अध्यादेश या प्रमाणे असेल. 

हेही वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कोण? १९ डिसेंबरला मुलाखती; अंतिम पाच ठरले

नियुक्तीची प्रक्रिया 

समितीने शिफारस केलेल्या नावांच्या पॅनेलमधून नियुक्ती केली जाईल. महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदीच्या तरतुदींतर्गत गठित
विश्व विद्यालय कायदा, 1997. जाहिरात आणि अर्जाचे स्वरूप वेबसाइटवर उपलब्ध आहे. http://www.education.gov.in आणि https://hindivishwa.org 
विहित प्रोफॉर्मामधील अर्ज 30 दिवसांच्या आत पोहोचने अनिवार्य आहे. 

अर्ज करण्याचा पत्ता : अवर सचिव (CU-IV डेस्क), उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय, खोली क्रमांक 216-डी, ‘डी’ विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली-110001. ''कुलगुरू, महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय विद्यापीठ या पदासाठी अर्ज लिफाफ्यावर हिंदी विद्यापीठ” असे लिहिलेले असावे, असे मंत्रालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नमुद करण्यात आले आहे.