EWS कोट्याचे योग्य पालन करा; सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना सुचना

केंद्र सरकारने EWS श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी १० टक्के आरक्षण निश्चित केले आहे. याचा अर्थ १० टक्के जागा वाढवून प्रवेश घ्यावा, असा अजिबात नाही.

EWS कोट्याचे योग्य पालन करा; सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना सुचना
NMC

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) देशातील वैद्यकीय महाविद्यालयांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच EWS कोट्याचे योग्य पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात  आयोगाने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या (Medical College) संचालकांना पत्र लिहून  याविषयी कळवले आहे. (Medical Education)

 

केंद्र सरकारने EWS श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी १० टक्के आरक्षण निश्चित केले आहे. याचा अर्थ १० टक्के जागा वाढवून प्रवेश घ्यावा, असा अजिबात नाही. सध्या एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी आयोगाने मंजूर केलेल्या जागांपैकी आरक्षित जागांवरच प्रवेश दिला जाऊ शकतो, अशी सुचना पत्रात करण्यात आली आहे.

रोहित पवारांकडून विद्यार्थ्यांची घोर निराशा ; सिनेट सदस्य असून विद्यार्थ्यांसाठी नाही वेळ?

 

दरम्यान, NMC ने वैद्यकीय महाविद्यालयांकडून प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती मागवली होती. या माहितीमध्ये  काही वैद्यकीय महाविद्यालयांनी एमबीबीएसच्या मंजूर जागांमध्ये १० टक्क्यांनी वाढ करून EWS श्रेणीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतले. 

 

याबाबत विचारणा केली असता महाविद्यालयांनी सरकारच्या EWS कोट्याचा हवाला दिला होता. या पार्श्वभूमीवर  NMC ने देशातील वैद्यकीय महाविद्यालयांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच EWS कोट्याचे योग्य पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k