ऑर्चिड्स इंटरनॅशल स्कुल ने अनोख्या पद्धतीने साजरे केले चंद्रयान-३ मिशन

देशात १२ हजार शाखा असणाऱ्या ऑर्चिड्स इंटरनॅशल स्कुलनेही हा क्षण अनोख्या पद्धतीने साजरा केला. शाळेच्या सर्व शाखेत हा उपक्रम राबवण्यात आला होता.

ऑर्चिड्स इंटरनॅशल स्कुल ने अनोख्या पद्धतीने साजरे केले चंद्रयान-३ मिशन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

चंद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहिमेचा ऐतिहासिक क्षण प्रत्येक भारतीयाने जल्लोषात साजरा केला. देशभरातील अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये २३ ऑगस्ट या दिवशी जणू उत्सवाचे वातावरण होते. पुण्यातील (Pune) ऑर्चिड्स इंटरनॅशल स्कुलने (Orchid's International School) ही हा क्षण अनोख्या पद्धतीने साजरा केला. शाळेच्या सर्व शाखेत हा उपक्रम राबवण्यात आला होता.

"अंतराळातील भारत" या संकल्पनेवर डिजिटल पोस्टर बनवण्याची स्पर्धा, कचऱ्यापासून सर्वोत्कृष्ट इस्रो रॉकेट/ सॅटेलाइट/ चंद्रयान मॉडेल तयार करणे, ISRO टीमचे त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करणारी पत्र लेखन स्पर्धा, व्हिडिओ/रील स्पर्धा अशा विविध स्पर्धा या निमित्ताने भरवण्यात आल्या होत्या. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

पोलीस उपायुक्तांसह दामिनी पथकासोबत चिमुकल्यांचे अनोखे ‘रक्षाबंधन’

ऑर्चिड्स इंटरनॅशल स्कुलच्या बंगळुरू झोन १ च्या प्रमुख डॉ. वेदवती बायसानी म्हणाल्या, “एक शैक्षणिक  संस्था या नात्याने, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि त्यांना हुशार विचारवंत म्हणून पुढे येण्यास मदत करणे हे आमचे ध्येय आहे.

चंद्रयान ३ मोहिमेच्या या ऐतिहासिक कार्यक्रमादरम्यान आमच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले उपक्रम पाहणे आमच्यासाठी खूप रोमांचक होते. आमच्या भारतीय शास्त्रज्ञांनी देशाला पुन्हा एकदा जागतिक नकाशावर मानाचे  स्थान प्राप्त करून दिले आहे. या ऐतिहासिक क्षणाला आम्ही संपूर्ण देशासोबत अभिमानाने साजरा केला, असे बायसानी यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo