MBA ची नुसती डिग्री उपयोगाची नाही; त्यानंतर काय करावे? विद्यापीठाच्या अधिष्ठातांनी सांगितले पर्याय...

MBA करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना यश मिळतेच असे नाही. त्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर (Students) उभे ठाकलेले असतात.

MBA ची नुसती डिग्री उपयोगाची नाही; त्यानंतर काय करावे? विद्यापीठाच्या अधिष्ठातांनी सांगितले पर्याय...
Career in MBA reprasentative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आजकाल करिअरच्या (Career) नवनव्या वाटा समोर येत आहेत. नवनवीन क्षेत्र खुली होत आहेत. त्याच प्रमाणे करिअरच्या नवनवीन संधीही निर्माण होत आहेत. असे असले तरी एमबीए (MBA) या अभ्यासक्रमाला मागणी कायम आहे. एमबीए झाल्यानंतर चांगल्या कंपनीत भरपूर पगाराची नोकरी (Job) मिळते. म्हणून एमबीए करण्याकडे बऱ्याच तरुणांचा (Youth) ओढा असतो. पण MBA करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना यश मिळतेच असे नाही. त्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर (Students) उभे ठाकलेले असतात.

या विषयी 'एज्युवार्ता'शी बोलताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) 'कॉमर्स अँड मॅनेजमेंट' विभागाचे प्रमुख डॉ. पराग काळकर (Parag Kalkar) म्हणाले, " MBA करत असताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्पेशलायझेशनचा विषय कळजीपूर्वक निवडावा. पण त्या विषयात फक्त चांगले मार्क मिळवून उपयोग नाही. कारण ती तुमची कागदी बुद्धिमत्ता झाली.

हेही वाचा : SPPU Rap Song Case :शुभम जाधव हाजीर हो! कुणाचे घेणार नाव?

शिकत असताना तुम्ही जे धडे घेता त्याचा उपयोग व्यावसायिक आणि व्यावहारिक क्षेत्रात कसा करता हे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी MBA ची डिग्री घेतल्यानंतर सुरुवातीला किमान दोन वर्ष एखाद्या छोट्या कंपनीत प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यावा. हे करत असताना विद्यार्थ्यांनी पॅकेज पेक्षा अनुभवाला जास्त महत्व द्यावे, असे काळकर यांनी सांगितले.

कामाचा अनुभव घेताना मोठ्या संस्थेत काम करण्यापेक्षा छोट्या कंपनीत काम करावे जेणेकरून तुम्हाला विविध क्षेत्रात काम करण्याची संधीही मिळेल. जेणेकरून तुम्हाला विविध क्षेत्रांचा जवळून अभ्यास करता येईल, तुमच्यासाठी कोणते क्षेत्र अधिक उपयुक्त आहे, तुम्हाला कुठे अधिक वाव आहे, याची माहिती होईल,"असा सल्लाही  काळकर यांनी दिला. 

डॉ. काळकर म्हणाले, "सध्याच्या बदलत्या काळात तंत्रज्ञान आणि सेवा या गोष्टींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  MBA च्या विद्यार्थ्यांनी स्पेशलायझेशनचे विषय निवडताना या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सध्या आर्थिक सल्लागार आणि आर्थिक नियोजन, प्रोजेक्ट मॅनेजर, मार्केटिंग आणि सेल्स, बँकिंग, इन्व्हेस्टमेंट, हेल्थ सर्व्हिस या क्षेत्रात चांगला वाव आहे."

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2