MHTCET 2023 : प्रवेशपत्र लगेचच करा डाउनलोड; अशी आहे प्रक्रिया...

MHTCET सेलकडून  ४ मे रोजी अधिकृत संकेतस्थळावर पीसीएम ग्रुपची हाॅलतिकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

MHTCET 2023 : प्रवेशपत्र लगेचच करा डाउनलोड; अशी आहे प्रक्रिया...
MHT CET 2023 Admit Card

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमात प्रवेश (Engineering Admission) घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली MHTCET 2023  (State Common Entrance Test Cell)  पीसीएम ग्रुपची (PCM Group) यंदाची परिक्षा ९ मे ते  १३ मे दरम्यान होणार आहे. त्यामुळे प्रवेशपत्र (Hall Ticket) कधी उपलब्ध होणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता संपली आहे.

MHTCET सेलकडून  ४ मे रोजी अधिकृत संकेतस्थळावर पीसीएम ग्रुपची हाॅलतिकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तर ५ मे रोजी रात्री आठ वाजल्यापासून विद्यार्थी  संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. त्यासाठी सर्वप्रथम mhtcet2023.mahacet.org या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर होमपेजवरील  CET Admit Card च्या ऑप्शनवर क्लिक करा. तिथे लॅागीनची माहिती भरून ती माहिती सबमिट करावी लागेल.

हेही वाचा : MPSC Exam : गोपनीय कामांसाठी मिळेनात विषयतज्ज्ञ; सरकारने थेट आदेश काढूनच ठणकावले

सीईटीच्या पीसीएम व पीसीबी या दोन्ही ग्रुपच्या परिक्षा दोन सत्रात होणार आहेत. सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २ ते ५  या वेळांमध्ये परिक्षा होणार आहेत. पीसीबी ग्रुपच्या (PCB Group) परीक्षा १५ मे ते २० मे दरम्यान होणार आहेत. त्यामुळे परीक्षेच्या काही दिवस आधी या ग्रुपची प्रवेशपत्र सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. 

दरम्यान, यावर्षी सीईटीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत आहे. यावर्षी ४ लाख १४ हजार ९६८ उमेदवार सीईटीची परीक्षा देणार आहेत. या  अभियांत्रिक, फार्मसी आदी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे प्रवेश अवलंबून आहेत. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2