11th Admission : तिसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिध्द, १४ हजार ७०० विद्यार्थ्यांची निवड

तिसऱ्या फेरीसाठी ५७ हजार ६१५ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी ४१ हजार २२५ विद्यार्थी पात्र ठरले होते. या विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ७०८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

11th Admission : तिसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिध्द, १४ हजार ७०० विद्यार्थ्यांची निवड
11th Admission Process Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण विभागाने (Education Department) बुधवारी इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या (11th Admission Online Process) तिसऱ्या नियमित फेरीची निवड यादी प्रसिध्द केली. या फेरीमध्ये पुण्यात (Pune) १४ हजार ७०८ विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक ५ हजार ७५ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळाले आहे. (11th Admission Third round selection list is released)

पुण्यात तिसऱ्या फेरीसाठी ५७ हजार ६१५ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी ४१ हजार २२५ विद्यार्थी पात्र ठरले होते. या विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ७०८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आता या विद्यार्थ्यांना १४ जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल. कॉलेज लॉगीनमध्ये प्रवेश ऑनलाईन निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे तसेच प्रवेश नाकारणे या प्रक्रिया सुरू राहतील. कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

अखेर ‘फार्मसी’ची प्रवेश प्रक्रिया सुरू; सीईटी सेलकडून सविस्तर वेळापत्रक जाहीर

 ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे विद्यालय अलॉट झालेले आहे, त्यांनी तेथेच प्रवेश घेणे अनिवार्य आहे. प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला गेला, तर त्यांना पुढील का नियमित फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल आणि त्या फेरीनंतरच प्रवेशासाठी त्यांचा विचार केला जाईल.

प्रवेश रद्द केलेले विद्यार्थीही पुढील फेरीसाठी प्रतिबंधित केले जातील. दरम्यान, पहिल्या फेरीत २३ हजार २३४ तर दुसऱ्या फेरीत ९ हजार २६० विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. आता तिसऱ्या फेरीनंतर विशेष फेरीचे आयोजन केले जाणार आहे. कोटा आणि द्विलक्षी जागांवरही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

तीन फेऱ्यांची आकडेवारी

पात्र विद्यार्थी  निवड झालेले प्रवेश घेतलेले

६३,४४२       ४२,२३२       २३,२३४

४४,५४०       २०,६०२       ९,२६०

४१,२२५       १४,७०८       --    

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD