अपहरण करून मुलाचं ट्रान्सजेंडर केलं, विद्यार्थ्यासोबत भयंकर घडलं
तरुणाला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं. नेहा खान उर्फ नेहा इप्टे आणि तिच्या साथीदारांनी दबाव, मारहाण आणि अश्लील व्हिडिओद्वारे धमकावल्याचा दावाही या तरुणाकडून करण्यात आला आहे. त्याच्यावर दबाव आणत त्याची जेंडर सर्जरी करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मालाड ट्रान्सजेंडर गँगकडून (Malad transgender gang) महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालाडमध्ये 19 वर्षीय तरुणाचं अपहरण (Kidnapping of a 19-year-old youth) करीत त्याच्यावर जबरदस्तीने जेंडर सर्जरी (Gender surgery) केल्याचा गंभीर आरोप या तरुणाने केला आहे. यासाठी तरुणाला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं. नेहा खान उर्फ नेहा इप्टे आणि तिच्या साथीदारांनी दबाव, मारहाण आणि अश्लील व्हिडिओद्वारे धमकावल्याचा दावाही या तरुणाकडून करण्यात आला आहे. त्याच्यावर दबाव आणत त्याची जेंडर सर्जरी करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
28 ऑक्टोबरला आरोपींनी तरुणाला सूरतच्या रुग्णालयात नेऊन अनिच्छेने जेंडर बदल शस्त्रक्रिया केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. भिक्षा मागण्यास भाग पाडणे, पैसे उकळण्याचा प्रयत्न आणि सततच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपी पीडित तरुणाकडून करण्यात आला आहे. अखेर पीडिताने 4 नोव्हेंबरला पळून स्वत:ची सुटका करून घेतली. यानंतर त्याने पोलिसात धाव घेतली.
पीडित तरुणाने आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. मालवणी पोलिसांनी अपहरण, ब्लॅकमेल, जबरदस्ती आणि वैद्यकीय अत्याचारासह अनेक कलमांखाली केस नोंदवली आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून रुग्णालय रेकॉर्ड आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे.
eduvarta@gmail.com