मूकबधीर मुलांना व्यवसाय शिक्षणाची संधी; शासकीय संस्थेची प्रवेशप्रक्रिया सुरू
मुलांना औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर सुतारकाम, जोडारी, तारतंत्री यासंबंधी एक वर्षीय प्रशिक्षण विभागांमध्ये देण्यात येते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
ठाणे (Thane) जिल्ह्यातील उल्हासनगर येथील शासकीय प्रौढ मूकबधीर प्रशिक्षण केंद्रामध्ये (Government Institute) येत्या शैक्षणिक वर्षासाठी प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थींना प्रवेश देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी २० जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन केंद्राच्या अधिक्षकांनी केले आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाअंतर्गत हे केंद्र चालविले जाते. (Vocational Training to Deaf and Dumb)
संस्थेत १६ ते ४५ वर्ष या वयोगटातील, इयत्ता ६ वी (वरिष्ठ) उत्तीर्ण, कोणताही गंभीर आजार नसलेले व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, किमान ४० टक्के कर्णबधीर असलेल्या मुलांना औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर सुतारकाम, जोडारी, तारतंत्री यासंबंधी एक वर्षीय प्रशिक्षण विभागांमध्ये देण्यात येते. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क वगळता निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य विनामूल्य पुरविण्यात येते.
व्यसनी शिक्षकांनो खबरदार! शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली मोठी घोषणा, लवकरच परिपत्रक काढणार
प्रवेश अर्जाचे वाटप कामकाजाच्या दिवशी शासकीय सुट्ट्या वगळून कार्यालयीन वेळेत संस्थेच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. टपालाने अर्ज मागवावयाचे असल्यास संस्थेच्या पत्त्यावर दहा रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेले व स्वतःचा संपूर्ण पत्ता असलेला (पिनकोडसह) लिफाफा पाठवावा. अर्ज व्यक्तिशः किंवा टपालाद्वारे दिले जातील. असे अधीक्षकांनी कळविले आहे.
संस्थेमध्ये संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक - ९२८४९३७८१३, ९०२१४०३९३८, ८६०००११४८९
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
eduvarta@gmail.com