राज्यात वीस वर्षांनंतर पहिल्या टप्प्यात भरली शिक्षकांची 11 हजार पदे - शिक्षण आयुक्त सूरज मांढरे

पहिला टप्पा रविवारी रात्री पूर्ण करण्यात आला असून जवळपास 11 हजार नवीन शिक्षकांची भर राज्यातील शाळांमध्ये पडलेली आहे.

राज्यात वीस वर्षांनंतर पहिल्या टप्प्यात भरली शिक्षकांची 11 हजार पदे - शिक्षण आयुक्त सूरज मांढरे

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यात गेल्या 20 वर्षातील सर्वात मोठ्या शिक्षक भरतीचा (Teacher Recruitment) पहिला टप्पा रविवारी रात्री पूर्ण करण्यात आला असून जवळपास 11 हजार नवीन शिक्षकांची भर (Addition of 11 thousand new teachers)राज्यातील शाळांमध्ये पडलेली आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पध्दतीने राबवली जात आहे. मात्र, या उपरही कोणाच्या काही शंका असल्यास त्याचे अधिकृतरित्या निरसन करण्यासाठी पहिल्यांदाच "तक्रार निवारण व दुरुस्ती समितीची" रचना करण्यात आली आहे,असे राज्याचे शिक्षण आयुक्त सुराज्य मांढरे (State Education Commissioner Surajya Mandhare) यांनी स्पष्ट केले. 

सूरज मांढरे म्हणाले, शिक्षण विभागातर्फे पूर्णपणे पारदर्शक व कोणत्याही प्रभावाखाली न येता ही प्रक्रिया पूर्ण केली गेली. संपूर्ण प्रक्रिया सुरू असताना समाज माध्यमांवर उपस्थित झालेल्या प्रत्येक प्रश्नाला प्रशासनाने उत्तर दिले तर अभियोग्यताधारकांच्या व्यक्तिगत संदेशांना सुद्धा उत्तर दिले.अधिकृत न्यूज बुलेटीन पोर्टलवर दररोज प्रसारित करण्यात आले. तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे edupavitra२०२२@gmail.com या इमेलद्वारे संपर्क साधावा. 

हेही वाचा : शिक्षण शिक्षक भरती शिफारशीनंतरही भाषा, गणित,विज्ञान विषयासह माजी सैनिक,खेळाडूंच्या हजारो जागा रिक्त

या संपूर्ण प्रक्रियेत गैरप्रकार करण्यास कोणासही संधी मिळू नये यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांचे फोन रेकॉर्ड करावेत, फोटो ठेवावेत व अशांविरुद्ध थेट पोलीस तक्रार करावी, असे खुले आवाहन केले होते. अभियोग्यताधारकांना संभ्रमित करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अनेकविध उपाययोजना केल्या गेल्या,असे नमूद करून मांढरे म्हणाले, या प्रक्रियेदरम्यान जेव्हा जेव्हा काही प्रश्न अथवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या त्याचे मंत्रालय स्तरावरून  मंत्री शिक्षण व प्रधान सचिव यांनी अत्यंत तातडीने व प्रगल्भतेने निराकरण केल्यामुळे प्रक्रिया पुढे नेणे सुकर झाले. या सर्वांचा परिणाम म्हणून सोमवारी निवड न झालेल्या उमेदवारांमध्ये देखील भरती प्रक्रिया अत्यंत निष्पक्ष पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पूर्ण झाल्याची भावना असून त्यांनी ती बोलून दाखवली आहे. एकंदरीत इतक्या उचित पद्धतीने निवड झालेले सर्व नवीन शिक्षक, विद्यार्थी घडवण्याच्या कामात त्यांचे पूर्ण योगदान देतील, अशी अपेक्षा आहे.