राज्य अभ्यासक्रम आराखडा वादात? ; मनुस्मृती मधील कोणता संदर्भ वापरला

राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसूद्यामध्ये भारतीय ज्ञान प्रणाली या घटकांमध्ये मनाचे श्लोक तर मूल्य आणि स्वभाववृत्ती या घटकांमध्ये मनुस्मृतीचा संदर्भ वापरण्यात आला आहे.

राज्य अभ्यासक्रम आराखडा वादात? ; मनुस्मृती मधील कोणता संदर्भ वापरला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (NEP)भारतीय ज्ञानपरंपरेला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना भारताच्या पुरातन साहित्य, संस्कृती व ज्ञान परंपरेची माहिती व्हावी; या उद्देशाने शालेय व उच्च शिक्षण अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान प्रणाली अर्थात इंडियन नॉलेज सिस्टीमचा (Indian Knowledge System)अंतर्भाव केला आहे.मात्र, राज्य अभ्यासक्रम आराखाड्यामध्ये (state curriculum framework -SCF) मनुस्मृती  (Manusmriti)ग्रंथामधील संदर्भ वापरल्याने राज्य अभ्यासक्रम आराखाड्याचा मसुदा वादात सापडला आहे.

NEP राज्य अभ्यासक्रम आराखडा जाहीर; प्रतिक्रिया स्वीकारण्यास सुरूवात

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून राज्य अभ्यासक्रम (Manusmriti)आराखडा तयार करण्यात आला असून त्यावरील प्रतिक्रिया येत्या 23 मे ते 3 जून या कालावधीपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. या राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसूद्यामध्ये भारतीय ज्ञान प्रणाली या घटकांमध्ये मनाचे श्लोक तर मूल्य आणि स्वभाववृत्ती या घटकांमध्ये मनुस्मृतीचा संदर्भ वापरण्यात आला आहे. त्यामुळे काही संघटनांकडून त्यास विरोध केला जात आहे.

अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः । चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्याशोबलम ।।
(संदर्भ : मनुस्मृती)

संस्कृत भाषेतील हा श्लोक आपल्याला ज्येष्ठ नागरिक पालक शिक्षक यांची सेवा व आदर केल्यास आयुष्य विद्या यश आणि बळ वाढते असा विश्वास देतो. अगदी त्याचप्रमाणे प्राचीन संस्कृती व सभ्यता यांचा मेळ म्हणजे मूल्य व स्वभावृद्धी होय. राष्ट्रीय अभ्यासक्रमा आराखड्यामध्ये शिक्षणाच्या ध्येयांमधील मूल्यांचे विकसन हा विभाज्य भाग आहे. असा मजकूर मनुस्मृती मधील वरील श्लोकाच्या खाली दिला आहे.

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद प्रसिद्ध करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात शिवकालीन संस्कृती, संत परंपरेचा वारसा, ऋषी, गुरु शिष्य परंपरा, भारतीय शिक्षण व्यवस्थेतील महान विद्वान, भारतीय क्रांतिकारक आदी घटकांचा सुध्दा समावेश केला आहे.

-------------------

फक्त एकाच धर्माच्या अभ्यासक्रमाचा जर समावेश केला तर, इतर सर्व समाजामध्ये एक तेढ निर्माण होऊ शकतो. कारण या देशांमध्ये हिंदू मुस्लिम,सिख,ईसाई,पारसी,असे अनेक समुदायाचे लोक हे अनेक वर्षापासून गुण्या गोविंदाने या देशात एकत्रपणे रहात आहेत.हिंदूंच्या धर्म ग्रंथाच्या अभ्यासक्रमाचा जर त्या अभ्यासक्रमात समावेश केला असेल तर स्वागतच आहे. जर हिंदू धर्मग्रंथाच्या अभ्यासक्रमांचा समावेश या पाठ्यक्रमामध्ये असेल तर,इतर धर्माच्या धर्म ग्रंथांचाही त्या पाठयक्रमात समावेश झालाच पाहिजे. म्हणजे येणाऱ्या पिढीला सर्व धर्मांचा आणि त्यांच्या धर्मग्रंथांचा सर्वतोपरी अभ्यास असेल.
त्यामुळे समाजात कोणतीही मोठी धार्मिक आणि जातीय दरी निर्माण होऊ शकणार नाही. त्यामुळे,भगवत गीता,मनुस्मृति आणि मनाचे श्लोक,कुराण, बायबल, गुरु ग्रंथ साहिब,या सर्वधर्म ग्रंथांचा या अभ्यासक्रमात समावेश करा.

- दिलीप सिंग विश्वकर्मा.
महापॅरेंट्स पुणे.