NEP राज्य अभ्यासक्रम आराखडा जाहीर; प्रतिक्रिया स्वीकारण्यास सुरूवात

सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया येत्या 23 मे ते 3 जून या कालावधीपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत.

NEP राज्य अभ्यासक्रम आराखडा जाहीर; प्रतिक्रिया स्वीकारण्यास सुरूवात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या NEPअंमलबजावणीच्या अनुषंगाने इयत्ता तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा पाठ्यक्रम तयार करण्यासाठी आवश्यक असलेला मार्गदर्शक राज्य अभ्यासक्रम आराखडा (SCF-SE ) (शालेय शिक्षण 2024 मसुदा) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT)मार्फत तयार करण्यात आला आहे. प्रशिक्षण परिषदेच्या https://www.maa.ac.in/ संकेतस्थळावर हा मसुदा येत्या 23 मे पासून उपलब्ध करून दिला जाणार आहे.त्यावर सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया येत्या 23 मे ते 3 जून या कालावधीपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या या संकेतस्थळावर राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा सर्व समाज घटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिक्षक, पालक शिक्षण तज्ज्ञ ,शैक्षणिक प्रशासन क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ यांनी आपले अभिप्राय 3 जून पर्यंत नोंदवावेत किंवा पोस्टाने पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे. अभिप्राय नोंदवत असताना त्यामध्ये नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल, पत्ता, कार्यालय, जिल्हा इत्यादी तपशील देण्यात यावा. तसेच अभिप्राय व सूचना स-प्रमाण व सकारण नोंदविल्या जाव्यात. त्यामध्ये क्षेत्र विषय स्तर, पृष्ठ क्रमांक, मूळ मसुद्यातील तपशील, आवश्यक बदलण्याचे कारण, कोणत्या मसुदामध्ये दुरुस्ती आवश्यक वाटते याचा तपशील ,सुधारित मजकूर कसा असावा, याचा समावेश असणे अपेक्षित आहे.

राज्य अभ्यासक्रम आराखडा वादात? ; मनुस्मृती मधील कोणता संदर्भ वापरला

पोस्टाने अभिप्राय पाठवणार असल्यास त्यावर SCF-SE राज्य अभ्यासक्रम आराखडा याबाबत अभिप्राय,असे ठळक अक्षरात लिहून राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या पत्त्यावर पाठवावे. अभिप्राय नोंदवण्यासाठी ही https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdhInitr6Bz_IHeezn5eagI6z53QoeRudCHkS7488no92BgnQ/viewform

लिंक देण्यात आली आहे, असे प्रसिद्धीपत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखाराव यांनी प्रसिद्ध केले आहे.