'एनईपी'च्या पार्श्वभूमीवर राज्यातील १२ लाख ४० हजार निरीक्षरांना करणार साक्षर

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी प्रक्रियेला येत्या २९ जुलै रोजी ३ वर्ष  पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने शिक्षण विभागातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत नेहा बेलसरे बोलत होत्या.

'एनईपी'च्या पार्श्वभूमीवर राज्यातील १२ लाख ४० हजार निरीक्षरांना करणार साक्षर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP 2020) अंमलबजावणीला सुरुवात झाली असली तरी शालेय शिक्षणाच्या (School Education) आराखडा अद्याप अंतिम स्वरूप प्राप्त झाले नाही. त्यामुळे पायाभूत शिक्षणासह एनईपी मधील अनेक महत्त्वाच्या बाबींना पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरुवात होईल. एनईपीच्या पार्श्वभूमीवर भारत साक्षरता अभियान (Litaracy Program) राबवले जात असून महाराष्ट्रातील १२ लाख ४० हजार निरीक्षरांना साक्षर करण्याचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (MSCERT) उपसंचालिका व एनईपीच्या राज्य समन्वयक नेहा बेलसरे (Neha Belsare) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी प्रक्रियेला येत्या २९ जुलै रोजी ३ वर्ष  पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने शिक्षण विभागातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत नेहा बेलसरे बोलत होत्या. यावेळी केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आदींचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आंतरजिल्हा बदल्या केल्याशिवाय शिक्षक भरती नको! विधानसभेत आमदारांची मागणी

बेलसरे म्हणाल्या, स्ट्रेट करिक्युलम फ्रेमवर्क (एससीएफ ) तयार करण्याचे काम सुरू आहे. एनईपीनुसार इयत्ता दहावी- बारावीचे महत्व कमी करणे, विद्यार्थ्यांना व्यवसायिक शिक्षणाकडे घेऊन जाणे आदी गोष्टी केल्या जात आहेत. एबीपी नुसार पायाभूत शिक्षणाचा टप्पा पुढील शैक्षणिक वर्षापासून अमलात आणला जाणार आहे त्या संदर्भातील सर्व पूर्वतयारी राज्य शासनाने केली आहे.

केंद्र शासनातर्फे महाराष्ट्राला पाच शैक्षणिक चॅनेल मिळाले असून सध्या त्याचे काम सुरू आहे. लवकरच हे चॅनल विद्यार्थ्यांसाठी सुरू केले जातील, असेही बेलसरे यांनी सांगितले. सीबीएसईचे पुणे विभागीय संचालक रामवीर म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने देशभरातील सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी विजेची व अन्नाची बचत करणे, प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करणे,असे उपक्रम सर्व शाळांमध्ये राबवले जात आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे 29 व 30 जुलै रोजी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बिंदू नामावली अंतिम करण्याचे काम सुरू

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव आणि राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी शिक्षक भरती संदर्भात प्रत्येक आठवड्याला एक अशा चार बैठका  घेतल्या आहेत. सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी याबाबत संदर्भात संवाद साधलेला आहे. तसेच बिंदू नामावली अतिंम करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच पुढील प्रक्रिया होणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD