केंद्रप्रमुख पदाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; आता परीक्षा पुढच्या वर्षी

परीक्षा परिषदेतर्फे 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने या परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. परीक्षेची माहिती अधिसूचना वेळापत्रक राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र,काही तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

केंद्रप्रमुख पदाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; आता परीक्षा पुढच्या वर्षी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra State Examination Council) डिसेंबर 2025 मध्ये घेतल्या जाणाऱ्या केंद्रप्रमुख पदाच्या (Head of Center)परीक्षा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जानेवारी-फेब्रुवारी 2026 मध्ये घेतल्या जाणार असून त्याचे सुधारित वेळापत्रक यथावकाश परीक्षा परिषदेच्या (examination council) संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार येत्या 1 जानेवारी 2026 पर्यंत परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी 'समूह साधन केंद्र समन्वयक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025' घेतली जाणार होती. परीक्षा परिषदेतर्फे 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने या परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. परीक्षेची माहिती अधिसूचना वेळापत्रक राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र,काही तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 10 नोव्हेंबर रोजी संपणार आहे.मात्र,अर्ज भरण्याची मुदत आता 1 जानेवारी 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.त्यामुळे उमेदवारांचा अनुभव शैक्षणिक पात्रता ही 1 जानेवारी 2026 रोजीची अंतिम समजण्यात येणार आहे, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.