गतिमंद मुलाला कुकरच्या झाकणाने बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

शाळेत शिक्षण घेत असलेल्या लहान गतिमंद मुलाला शाळेतील शिपाई दीपक इंगळे याने कुकरच्या झाकणाने बेदम मारहाण केले. या घटनेचे चित्रीकरण मोबाईलमध्ये करण्यात आले. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

गतिमंद मुलाला कुकरच्या झाकणाने बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

गतिमंद विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका लहान गतिमंद मुलाला हात बांधून कुकरच्या झाकणाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मुलाला मारहाण करणाऱ्या शाळेतील शिपायावर कठोर कारवाई करावी,अशी मागणी केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)येथील मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी गतिमंद विद्यालयात (chaityan kanifnath residential school in matimand vidyalaya)हा प्रकार घडला आहे. 

शाळेत शिक्षण घेत असलेल्या लहान गतिमंद मुलाला शाळेतील शिपाई दीपक इंगळे याने कुकरच्या झाकणाने बेदम मारहाण केले. या घटनेचे चित्रीकरण मोबाईलमध्ये करण्यात आले. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. केवळ याच विद्यार्थ्याला मारहाण केली असे नाही; तर विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना सुद्धा अशा अत्याचाराला सामोरे जावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यालयातील केअरटेकर हे देखील विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांनी या सर्व घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज जमा केले आहे. 

गतिमंद विद्यार्थ्याला अमाणूश वागणूक दिली जात असून त्यामुळे समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान हा सर्व प्रकार कसा समोर आला याबाबत माहिती घेतली जात आहे. या घटनेनंतर शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले जात असून शाळा प्रशासनालाही दोषी ठरवले जात आहे.