स्वच्छता मॉनिटर उपक्रमाच्या ' रोहित आर्या' चा एन्काऊंटर; 17 मुलांना ठेवले होते ओलीस
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
स्वच्छता मॉनिटर(Swachhata Monitor) या उपक्रमाच्या माध्यमातून यापूर्वी सर्वांसमोर आलेल्या रोहित आर्याने (rohit Arya)पवईतील एका स्टुडिओमध्ये 17 विद्यार्थ्यांना पोलीस ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी या सर्व प्रकरणात हुशारीने लहान मुलांना किडनॅप ( pavai kidnapping) करणाऱ्या रोहित आर्याचा एन्काऊंटर (Encounter Rohit Arya) करून मुलांची सुटका केली. रोहित आर्याने यापूर्वी आपल्या मागण्यांसाठी विविध प्रकारे आंदोलने केली होती. मात्र, एखाद्या माथेफिरू प्रमाणे त्याने विद्यार्थ्यांना ओलीस ठेवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
पवईतील एका स्टुडिओमध्ये विद्यार्थ्यांचे ऑडिशन सुरू होते या ठिकाणी रोहित आर्याने 17 विद्यार्थ्यांना एका खोलीमध्ये बंद करून दाबून ठेवले. मी कोणी गुन्हेगार नाही पण माझ्या काही मागण्या आहेत. असे म्हणत त्याने हा नियमबाह्य मार्ग निवडला. स्टुडीओ मध्ये ऑडिशन साठी गेलेली मुले लंच ब्रेक झाला तरी बाहेर का येत नाहीत यामुळे पालक चिंतेत होते. काही वेळानंतर पालकांना इमारतीच्या खिडकीच्या काचेमध्ये लहान मुले आरडाओरडा करत असल्याचे दिसले. त्यानंतर हा सर्व प्रकार पोलिसांना कळविण्यात आला. पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा तपास केल्यानंतर हे सर्व रोहित आर्या या माथे फिरवणे केले असल्याचे निदर्शनास आले. रोहित आर्याने शालेय शिक्षण विभागाबरोबर काही करार करून स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवला होता. त्याबाबतचे काही पैसे त्याला शासनाकडून मिळणे अपेक्षित होते. माझी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडेही त्याने याबाबत मागणी केली होती. तसेच पुणे मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनही केले होते. परंतु, रोहित आर्याने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात होते.
गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रोहित आर्याने पवईतील इमारतीमध्ये 17 मुलांना पोलीस ठेवले. पोलिसांनी या सर्व प्रकारात अत्यंत हुशारीने रोहित आर्याला संभाषणामध्ये गुंतून ठेवले. त्यानंतर पोलीस दलातील एक अधिकारी त्या इमारतीच्या स्वच्छतागृहाच्या खिडकीतून किडनॅप केलेल्या मुलांच्या खोलीत शिरला. त्यानंतर मुलांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित आर्याकडे बंदूक होती. पोलीस आल्याचे पाहून रोहित आर्याने फायरिंग केले त्यानंतर पोलिसांनीही रोहित आर्याला छातीत गोळी मारली. त्यात जखमी झालेल्या रोहित आर्या चा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आले आहे.
eduvarta@gmail.com