एन्काऊंटर पूर्वी रोहित आर्याला दीपक केसरकरांशी काय बोलायचे होते; आर्या एन्काऊंटर प्रकरणाला वेगळे वळण 

रोहित आर्याने ओलीसनाट्य सुरू केले होते. त्याने याबाबत मला काही व्यक्तींशी बोलायचे आहे असे व्हिडिओद्वारे सांगितले होते. ते व्यक्ती म्हणजे केसरकर होते.

एन्काऊंटर पूर्वी रोहित आर्याला दीपक केसरकरांशी काय बोलायचे होते; आर्या एन्काऊंटर प्रकरणाला वेगळे वळण 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

रोहित आर्या एन्काऊंटर (Rohit Arya Encounter)प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.पवईतील आरके स्टुडीओमध्ये (RK Studio in Powai)17 मुलांना ओलीस ठेवल्याच्या घटनेनंतर रोहित आर्याने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील एका पोलीस अधिकाऱ्याला माजी मंत्री दीपक केसरकर (Former Minister Deepak Kesarkar)यांच्याशी बोलायचे असल्याचे सांगितले होते. मात्र, केसरकर यांनी बोलण्यास नकार दर्शविला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून दीपक केसरकर यांचा जबाब नोंदविला जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्वच्छता मॉनिटर उपक्रमातील रोहित आर्या याच्या एन्काऊंटरच्या घटनेवर उलट सुलट चर्चा सुरू आहेत. रोहित आर्याने शिक्षण विभागासाठी केलेल्या कामाची रक्कम थकली असल्याचा दावा केला होता. त्याचप्रमाणे थकीत रक्कम मिळत नसल्याने नाराज असल्याचे त्याने सांगितले होते. त्यानंतर रोहित आर्याने ओलीसनाट्य सुरू केले होते. त्याने याबाबत मला काही व्यक्तींशी बोलायचे आहे असे व्हिडिओद्वारे सांगितले होते. ते व्यक्ती म्हणजे केसरकर होते. पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केसरकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना या परिस्थितीची माहिती दिली होती.तसेच आर्या यांच्याशी बोलण्यास सांगितले होते. परंत,त्यांनी आर्याशी बोलण्यास नकार दिला,असे संबंधित पोलीस अधिकारी सांगत आहे.

दरम्यान, रोहित आर्या एन्काऊंटर प्रकरणी आता वकील नितीन सातपुते यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून हा बनावट एन्काऊंटर असल्याचा आरोप केला आहे. तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे.