बारावीच्या परीक्षेस अर्ज करण्याची शेवटची संधी;11नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्कासह करा अर्ज

व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी,सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी या कालावधीत विलंबशुल्कसह अर्ज भरू शकतात.

बारावीच्या परीक्षेस अर्ज करण्याची शेवटची संधी;11नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्कासह करा अर्ज

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) फेब्रुवारी- मार्च 2026 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षा अर्जअ (Exam application form for 12th) भरण्यास मदत वाढ देण्यात आली आहे. विद्यार्थी विलंब शुल्कासह 4  नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरू शकतात, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे. 

राज्य मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले . मात्र काही कारणांमुळे परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी,सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी या कालावधीत विलंबशुल्कसह अर्ज भरू शकतात. राज्य मंडळातर्फे विलंबशुल्कसह अर्ज भरण्यासाठी ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

सर्व कनिष्ठ महाविद्यालय ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी कॉलेज प्रोफाइल मध्ये कॉलेज संस्था मान्यता प्राप्त विषय शिक्षक याबाबत योग्य माहिती भरून राज्य मंडळाकडे पाठवणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचा आभार आयडी उपलब्ध आहे,त्यांची नोंद ऑनलाईन अर्जामध्ये भरताना करण्यात यावी,अशा सूचना राज्य मंडळातर्फे देण्यात आल्या आहेत.