पुणे जिल्हा परिषद भरती : एक हजार पदांसाठी जाहिरात, शनिवारपासून भरा अर्ज

पुणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमधील एक हजार पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत.

पुणे जिल्हा परिषद भरती : एक हजार पदांसाठी जाहिरात, शनिवारपासून भरा अर्ज
Pune Zila Parishad

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर राज्यातील विविध जिल्हा परिषदांमध्ये भरती (Zila Parishad Recruitment) प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेमध्येही (Pune ZP) गट क संवर्गातील विविध २१ पदांच्या तब्बल एक हजार जागांसाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली असून इच्छूकांनी शनिवारपासून (दि. ५) ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेमध्ये यापूर्वी २०१५ मध्ये भरती प्रक्रिया राबविली होती. त्यानंतर नऊ वर्षांनी भरती होणार आहे. विविध विभागांमधील एक हजार पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. सर्व पदे गट क संवर्गातील आहेत. त्यासाठी दि. ५ ते २५ ऑगस्ट या कालावाधीत इच्छूकांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. २०१९ मध्ये भरतीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांनाही या प्रक्रियेत सहभागी होता येणार असून त्यांच्यासाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. तसेच त्यावेळी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना शुल्क परत केेल जाणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

परीक्षा घेणाऱ्या एजन्सीलाच ‘महाज्योती’कडून डच्चू; प्रवेश परीक्षांबाबत महत्वाची अपडेट

सर्वाधिक पदे ही आरोग्य सेवक महिला ही आहेत. राज्यात सर्वाधिक पदे नाशिक जिल्हा परिषदेमध्ये १ हजार ३२ एवढी भरली जाणार आहेत. तर त्याखालोखाल पुणे जिल्हा परि जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जिल्हा परिषद पुणेच्या www.zppune.org या लिंकवर पाहण्यास उपलब्ध आहेत.

याबाबत अधिक मदतीसाठी ०२०२१३४८०६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्ग साधता येईल.

या लिंकवर भरा अर्ज - https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/

सरळसेवेने भरायवयाची संवर्गनिहाय भरती योग्य पदे

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – ३३
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य) – ५९
  • ३. कंत्राटी ग्रामसेवक - ३७
  • विस्तार अधिकारी पंचायत – ३
  • आरोग्य सेवक महिला - ४३६
  • आरोग्य सेवक महिला ५०% - १२४
  • आरोग्य सेवक पुरुष ५०% - १२८
  • औषध निर्माण अधिकारी - २५
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ४
  • विस्तार अधिकारी सांख्यिकी - २
  • वरिष्ठ सहाय्यक लिपिक - ८
  • विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग ३ श्रेणी २ – २
  • पशुधन पर्यवेक्षक – ३०
  • विस्तार अधिकारी कृषी - २
  • कनिष्ठ आरेखक - २
  • कनिष्ठ लेखाधिकारी - ३
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा - ९
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा – १६
  • पर्यवेक्षिका - ९
  • रिगमन - १
  • कनिष्ठ सहाय्यक लिपिक – ६७

एकूण - १,०००

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD