विद्यार्थी गणवेश 100 रुपायांत कोण शिवून देणार; गणवेशासाठी मापे केव्हा घेणार ? 

गणवेशाचे कापड बचत गटापर्यंत पोहचले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कपड्याची मापे केव्हा घेणार आणि त्यांची शिलाई केव्हा केली जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विद्यार्थी गणवेश 100 रुपायांत कोण शिवून देणार; गणवेशासाठी मापे केव्हा घेणार ? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील शाळा (schools in the state) सुरू होण्यास काही दिवस उरले आहेत. मात्र,अद्याप गणवेशाचे कापड (Uniform cloth) बचत गटापर्यंत पोहचले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कपड्याची मापे केव्हा घेणार आणि त्यांची शिलाई (Stitching of uniforms) केव्हा केली जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.तसेच कमी विद्यार्थी असतील तर त्यांच्या कपड्यांची शिलाई शंभर रुपयांमध्ये करून मिळणे अवघड आहे. त्यामुळे स्काऊट गाईड (Scout Guide) चा गणवेश शिवून देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समिती (School Management Committee)अर्थात कार्यान्वयन करणाऱ्या मुख्याध्यापकाकडे देण्यात येऊ नये, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती (Maharashtra State Primary Education Committee)तर्फे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे (Project Director Pradeep Kumar Dange) यांना देण्यात आले आहे.

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, नगर पालिका, महानगर पालिकांच्या शाळांत इयत्ता १ ली ते ८ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेशाचे दोन संच पुरविण्यासाठी प्रती गणवेश ३०० रुपयांप्रमाणे अनुदान शाळा व्यवस्थापन समितीकडे उपलब्ध करून दिले जात होते. त्यानुसार दरवर्षी नवीन सत्रात शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वितरित केले जायचे. या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित सुरु असताना यावर्षी शासनाने गणवेश योजनेच्या अंमलबजावणीत विनाकारण बदल केला,अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती म्हणून आमची ठाम धारणा आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळ (Women Economic Development Corporation) अंतर्गत महिला बचत गटाच्या कारागिरांनी शाळेस भेट देऊन संबंधित इयत्तेतील प्रत्येक विद्यार्थी/ विद्यार्थिनींची मापे घेऊन Standard मापांनुसार गणवेश शिलाई करून शाळा स्तरावर पोहोचते करून द्यायचे आहे.विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शाळा शनिवारी येत्या १५ जून २०२४ रोजी सुरु होत असूनही विदर्भातील शाळा १ जुलै २०२४ पासून सुरु होत आहे. 

अद्यापपर्यंत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील एकाही शाळेत जाऊन शिलाईचे काम करणाऱ्या संस्थेच्या कारागिरांनी आजपर्यंत लाभार्थी विद्यार्थ्यांची मापे घेतलेली नाहीत. अशा परिस्थितीत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना योग्य मापाचे नियमित गणवेश कसे मिळतील..? तसेच अंदाजे मापे गृहीत धरून गणवेश शिलाई केल्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मापाचा गणवेश न मिळाल्यास पालकांच्या रोषाला स्थानिक शिक्षकांना सामोरे जावे लागणार आहे,असे समितीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नियमित गणवेशासह स्काऊट गाईडचा गणवेश सुद्धा संबंधित महिला बचत गटाकडून शिलाई करून दिल्या जाणार असल्याचे शासन आदेशात नमूद आहे. परंतु, आता शाळांना स्काऊट-गाईंडच्या गणवेशाचे कापड पुरविले जाणार आहे. त्यासाठी प्रती गणवेश शिलाईसाठी १०० रुपये व अनुषंगिक खर्चासाठी प्रती गणवेश १० रुपये अनुदान दिले जाणार आहे.नियमित गणवेश शिलाईसाठी महिला बचत गटांना एकत्रित मोठ्या संख्येने काम मिळाल्याने त्यांनी १०० रुपयात गणवेश शिलाईचे दर मान्य केले. परंतु, अगदी कमी संख्येने शाळेतील विद्यार्थी असल्याने अनेक शाळेत १५-२० किंवा त्यापेक्षा कमी अधिक संख्येने विद्यार्थी असल्यास केवळ १०० रुपयात हाफ पॅन्ट, शर्ट, फुल पॅन्ट-शर्ट, सलवार-कमीज, स्कर्टची शिलाई कोणीही करून देणे शक्य नाही,असेही निवेदनात म्हटले आहे.  

अत्यंत कमी संख्या असल्याने रुपये १०० इतक्या कमी पैशात कुठेही शिलाई करून मिळणे वास्तवात अशक्य आहे. त्यामुळे स्काऊट गाईडचा गणवेश शिवून देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समिती अर्थात कार्यान्वयन करणाऱ्या मुख्याध्यापकाकडे देण्यात येऊ नये. गणवेश योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी समजून घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. तसेच सर्व विद्यार्थ्यांना योग्य मापाचे गणवेश शाळेच्या पहिल्या दिवशी १५ जून २०२४ आणि विदर्भात १ जुलै २०२४ पूर्वी वितरित होण्याची कार्यवाही करावी. तसेच स्काऊट गाईडचे गणवेश सुद्धा नियमित गणवेशाप्रमाणे शिलाई करूनच शाळांना मिळावेत,अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे राज्य अध्यक्ष विजय कोंबे आणि राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी केली आहे.

शैक्षणिक सत्रात २०२४-२५ मध्ये जिल्हा परिषद(Zilla Parishad), नगर पालिका (Municipality), महानगर पालिका (Municipal Corporations) यांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना नियमित गणवेशाचा एक संच आणि स्काऊट गाईड गणवेशाचा एक संच पुरविण्याबाबत सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.गणवेश कापडाचे मायक्रो कटिंग करून आवश्यक संख्येने पुरवठा करण्याचे कंत्राट मे. पदमचंद मिलापचंद जैन (May. Padmachand Milapchand Jain) यांना ४ मार्च २०२४ रोजी दिले आहे. संबंधित पुरवठादाराने कापड बॉक्स प्रत्येक गट शिक्षणाधिकारी (Group Education Officer) यांना पुरवायचे आहे. त्यांनतर लोक संचालित साधन केंद्रांतर्गत (People operated resource center) स्थानिक स्तरावरील महिला बचत गटाद्वारे गणवेशाची शिलाई करून त्यांच्याकडून शाळांपर्यंत शिवलेल्या गणवेशाचा पुरवठा केला जाणार आहे.