IISERs IAT परीक्षेची उत्तर की प्रसिद्ध

IISER प्रवेश परीक्षेला बसलेले उमेदवार iiseradmission.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन IAT 2024 ची उत्तर की डाउनलोड करू शकतात.

IISERs IAT परीक्षेची उत्तर की प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISERs) ने ॲप्टिट्यूड टेस्ट (IAT) 2024 ची उत्तर की (Answer Key) प्रसिद्ध केली आहेत. IISER प्रवेश परीक्षेला बसलेले उमेदवार iiseradmission.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन IAT 2024 ची उत्तर की डाउनलोड करू शकतात.

IAT प्रतिसाद पत्रक (Student response) 12 जूनपासून उपलब्ध होईल. याशिवाय, IAT 2024 ची अंतिम उत्तर की (Final Answer Key) 21 जून 2024 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

IISER IAT 2024 परीक्षा 9 जून रोजी घेण्यात आली होती. भारतातील विविध केंद्रांवर संगणक-आधारित स्वरूपामध्ये ही परीक्षा घेण्यात आली. त्यात 60 प्रश्न होते, प्रत्येक विषयातील 15 प्रश्न त्यामध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र याचा समावेश करण्यात आला होता. हे सर्व प्रश्न बहुपर्यायी होते. या परीक्षेचा कालावधी तीन तासांचा होता तर आयएटी परीक्षा एकूण २४० गुणांची होती.

जे उमेदवार IAT 2024 च्या उत्तर की वर समाधानी नाहीत,  ते यावर आक्षेप नोंदवू शकतात. हरकती विंडो 14 जून 2024 पर्यंत खुली आहे. IAT 2024 उत्तर की विरुद्ध आक्षेप घेण्यासाठी उमेदवारांनी पोर्टलवर लॉग इन करणे आवश्यक आहे. इतर माध्यमातून सादर केलेल्या हरकती वैध मानल्या जाणार नाहीत, असेही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमार्फत सांगण्यात आले आहे.  

गुणांची गणना कशी कराल?

प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 4 गुण जोडावे. चुकीच्या उत्तरांसाठी 1 गुण वजा करावे. प्रयत्न न केलेल्या प्रश्नांसाठी कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत. संभाव्य गुण मिळवण्यासाठी एकूण गुण जोडावे.

उत्तर की (Answer Key) वर आक्षेप कसा नोंदवायचा?

सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम iiseradmission.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. मुख्यपृष्ठावरील IAT 2024 Answer Key लिंकवर क्लिक करा. क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा. उत्तर की आक्षेप लिंकवर क्लिक करा. तुम्हाला आव्हान करायचे असलेले उत्तर निवडा. सहाय्यक कागदपत्रे जोडा आणि सबमिट करावे.