डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कोणाची वर्णी ? आयआयटी पवईत २९ नोव्हेंबरला मुलाखती 

आयआयटी पवई येथे सकाळी नऊ वाजल्यापासून कुलगुरू पदाच्या मुलाखतीला सुरूवात होणार आहे. मुलाखतीसाठी निवडलेल्या २४ उमेदवारांमध्ये  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.मनोहर चासकर,भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.संजय जाडकर,भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय ढोले, बायोटेक्नॉलॉजी विभागाचे डॉ.राजू गच्छे तसेच  डॉ.विलास खरात यांचा समावेश आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कोणाची वर्णी ? आयआयटी पवईत २९ नोव्हेंबरला मुलाखती 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University) गेल्या काही दिवसांपासून कुलगुरू निवडीच्या (vice chancellor selection) प्रक्रियेमूळे चांगलेच चर्चेत आले आहे. कुलगुरू पदाच्या मुलाखतीसाठी निवडलेल्या २४ पात्र उमेदवारांपैकी काही उमेदवारांच्या निवडीवर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. येत्या २९ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे आयआयटी पवई (IIT Powai, Mumbai) येथे सकाळी नऊ वाजल्यापासून मुलाखतीला सुरूवात होणार असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत या मुलाखती होणार आहेत.त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) पाच उमेदवार सुध्दा मुलाखत देण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे अंतिम पाच उमेदवारांच्या यादीत कोणाची निवड होणार ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

हेही वाचा : शिक्षण क्लस्टर युनिव्हर्सिटी : उच्च व तंत्र शिक्षणमंत्रीच करणार शंकांचे निरसन ; मुंबईत २९ नोव्हेंबरला राज्यस्तरिय कार्यशाळा

औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाल येत्या 31 डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे पूर्ववेळ  कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कुलगुरू पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी करून २४ उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी करण्यात आली आहे.मात्र,  त्यात काही वादग्रस्त व्यक्ती निवडल्या गेल्या असल्याचे समोर आले आहे.तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह इतर विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांची नावे वगळली गेली आहेत.त्यामुळे कुलगुरू शोध समितीच्या कार्यपध्दतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.परंतु, वादग्रस्त व्यक्तीला मुलाखातीच्या वेळी लक्षात ठेवले जाईल,या समितीतील कुलगुरू शोध वारिष्ठ पदाधिका-यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना सांगितले. 

आयआयटी पवई या ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासून कुलगुरू पदाच्या मुलाखतीला सुरूवात होणार आहे. मुलाखतीसाठी निवडलेल्या २४ उमेदवारांमध्ये  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.मनोहर चासकर,भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.संजय जाडकर,भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय ढोले, बायोटेक्नॉलॉजी विभागाचे डॉ.राजू गच्छे तसेच  डॉ.विलास खरात यांचा समावेश आहे.या २४ उमेदवारांमधून अंतिम मुलाखतीसाठी पाच उमेदवार निवडले जाणार आहेत. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू म्हणून काम करणे आव्हानात्मक आहे.त्यामुळे हे आव्हान कोण स्वीकारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.तत्पूर्वी अंतिम पाच उमेदवारांमध्ये कोणाची निवड होते.हे पाहणे महत्त्वाचे आहे , कारण त्यानंतरच मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कोणाची वर्णी लागणार याचा अंदाज बांधणे शक्य आहे,अशी चर्चा सध्या शिक्षण वर्तुळात केली जात आहे.

कुलगुरू शोध समितीने मुलाखतीसाठी निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे : 


प्रा. हिरेंद्र सिंग, प्रा.विलास खरात, प्रा.सतीश शर्मा, प्रा.राजीव गुप्ता, प्रा.सुभाष कोंडवार, डॉ.एस के सिंग डॉ.गणेशचंद्र शिंदे, डॉ.विजय फुलारी प्रा.संजय चव्हाण, प्रा.राजेंद्र काकडे प्रा.भारती गवळी, प्रा.इंद्रप्रसाद त्रिपाठी , डॉ.अनिल चांदेवार, वरिष्ठ प्रा.ज्योती जाधव, डॉ. दत्तात्रय गायकवाड, डॉ.मनोहर चासकर, प्रा.राजेंद्र सोनकवडे, प्रा.उदय अन्नापुरे प्रा.अशोक महाजन,प्रा. संदेश जाडकर, प्रा.राजू गच्छे,प्रा. डॉ. संजय ढोले, डॉ.सतीश पाटील,प्रा. प्रमोद माहुलीकर .