क्लस्टर युनिव्हर्सिटी : उच्च व तंत्र शिक्षणमंत्रीच करणार शंकांचे निरसन ; मुंबईत २९ नोव्हेंबरला राज्यस्तरिय कार्यशाळा

Cluster University क्लस्टर विद्यापीठे स्थापन करण्यास पात्र असणाऱ्या शैक्षणिक संस्था चालकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच पुढाकार घेतला आहे. पाटील हे सर्व संस्था चालकांशी संवाद साधून समूह विद्यापीठासंदर्भातील समाज- गैरसमज दूर करणार आहेत.

क्लस्टर युनिव्हर्सिटी : उच्च व तंत्र शिक्षणमंत्रीच करणार शंकांचे निरसन ; मुंबईत २९  नोव्हेंबरला राज्यस्तरिय कार्यशाळा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Cluster University :समूह विद्यापीठ अर्थात क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापनेबाबत प्रसार माध्यमांमध्ये काही गैरसमज पसरवणाऱ्या बातम्या येत आहेत. मात्र हा गैरसमज दूर करण्यासाठी आणि क्लस्टर विद्यापीठे स्थापन करण्यास पात्र असणाऱ्या शैक्षणिक संस्था चालकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांनीच पुढाकार घेतला आहे. पाटील हे सर्व संस्था चालकांशी संवाद साधून समूह विद्यापीठासंदर्भातील समाज- गैरसमज दूर करणार आहेत. त्यासाठी येत्या २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई येथे समूह विद्यापीठ स्थापने संदर्भात एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे (One day state level workshop regarding establishment of Cluster University in Mumbai)आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा : क्ल्स्टर विद्यापीठ : नियमावलीत स्पष्टता आणि शिथिलता असावी; तज्ज्ञांची मागणी

 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्यात समूह विद्यापीठ स्थापनेला गती दिली जात आहे. राज्य मंत्रिमंडळात समूह विद्यापीठांच्या मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता देण्यात आली आहे. येत्या २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाच्या इतिवृत्तावर स्वाक्षरी होणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसात अध्यादेश प्रसिद्ध करून समूह विद्यापीठांची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जाणार आहेत, असे विश्वासनीय सुत्रांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, मंडळ बैठकीनंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील राज्यात समूह विद्यापीठे स्थापन करण्यास पात्र असणाऱ्या संस्थाचालकांशी संवाद साधणार आहेत.

मुंबईतील चर्चगेट परिसरातील सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या समूह विद्यापीठ स्थापने संदर्भातील एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेस सुमारे ५० हुन अधिक संस्थाचालक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यांना उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी,  उपसचिव अजित बाविस्कर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर ,तंत्र शिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर आदी मार्गदर्शन करणार आहेत.
---------------------------

"समूह विद्यापीठे ही चांगली संकल्पना आहे. मात्र, त्याबाबत गैरसमज पसरवणारी माहिती मुद्दाम काही प्रसार माध्यमांमधून प्रसिद्ध केली जात आहे. परंतु, सर्व गैरसमज दूर करण्यासाठी राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने येत्या 29 नोव्हेंबर रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केले आहे. त्यात संस्था चालकांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाणार आहे."
- डॉ शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण विभाग , महाराष्ट्र राज्य