आंबेडकर जयंतीला विद्यार्थ्याकडून ड्रेसकोडचे उल्लघन; कुलगुरूंना मागितली माफी 

विद्यार्थ्याने ड्रेसकोड न पळाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. शेवटी खुद्द कुलगुरूंनी माफी मागत संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकला. 

आंबेडकर जयंतीला  विद्यार्थ्याकडून ड्रेसकोडचे उल्लघन; कुलगुरूंना मागितली माफी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नुकताच देशभर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती (Babasaheb Ambedkar's birth anniversary) उत्साहात साजरी करण्यात आली. पण या कार्यक्रमात एका  विद्यार्थ्याने ड्रेसकोड (College student dress code) न पळाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. शेवटी खुद्द कुलगुरूंनी माफी (The Vice-Chancellor apologized) मागत संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकला. 

कोलकात्यातील शांतिनिकेतन येथील विश्व भारती विद्यापीठात हा प्रकार घडला. या विद्यापीठाकडून आयोजित सामाजिक कार्यक्रमात सर्वांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत असा इथला नियम आहे. 14 एप्रिल रोजी आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी एका विद्यार्थ्याने या ड्रेसकोड चे उल्लघन केले होते.  

केंद्रीय विद्यापीठाने सोमवारी एक निवेदन जारी करून या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आणि अशी घटना पुन्हा होणार नाही, याची ग्वाही दिली. घटनेबद्दल प्रभारी कुलगुरू संजयकुमार मलिक यांना माफी मागावी लागली. विश्व भारती युनिव्हर्सिटी फॅकल्टी असोसिएशनचे प्रवक्ते सुदिप्त भट्टाचार्य यांनी प्रभारी कुलगुरूंच्या या भूमिकेचे स्वागत केले.