'युनिव्हर्सिटीच अंमली पदार्थांचं सेंटर'; विद्यार्थ्याने केली अधिकाऱ्यांची बोलती बंद, व्हिडिओ व्हायरल

इथे समोरच पोलीस चौकी आहे आणि विशेष बाब म्हणजे, पोलीस स्टेशनसमोरच गांजा मिळतो. हे पोलिसांचं अपयश नाही का? असा थेट सवाल त्याने उपस्थित केला.

'युनिव्हर्सिटीच अंमली पदार्थांचं सेंटर'; विद्यार्थ्याने केली अधिकाऱ्यांची बोलती बंद, व्हिडिओ व्हायरल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सध्या सोशल मीडियावर (social media) एका घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral vidio) होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कॉलेजचा एक विद्यार्थ्यी (College students) जागेवरुन उठतो आणि पोलिसांचीच पोलखोल करतो. तो म्हणतो, की सर नशामुक्तीसाठी (Narshamukti Abhiyan) तुम्ही इतक्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पण खरं सांगायचं झालं तर युनिव्हर्सिटीच या अंमली पदार्थांचं (Narcotics) सेंटर आहे. त्याने हे बोलताच इतर विद्यार्थी टाळ्या वाजवू लागतात आणि मोठमोठ्याने ओरडून आपली सहमती दर्शवतात.

शाळा आणि काॅलेजचे विद्यार्थी शिक्षण सोडून अंमली पदार्थांसारख्या व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहेत. नको त्या वयामध्ये नको त्या गोष्टी घडताना दिसत आहेत. त्यापार्श्वभूमीवर शासन स्तरावर जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जात आहे. मात्र, अशाच एका कार्यक्रमात मार्गदर्शन करणाऱ्या अधिकाऱ्याची विद्यार्थाने बोलतीच बंद केली. मी युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे. इथे समोरच पोलीस चौकी आहे आणि विशेष बाब म्हणजे, पोलीस स्टेशनसमोरच गांजा मिळतो. हे पोलिसांचं अपयश नाही का? असा थेट सवाल त्याने उपस्थित केला. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून त्या मुलाच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.हरियाणातील सोनिपत येथील डॉ.बी.आर. आंबेडकर नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधील हा विद्यार्थी आहे. 

पुढे हा विद्यार्थी म्हणतो की, की इथे आम्ही 4-5 युनिव्हर्सिटीचे लोक बसलो आहेत. आज ड्रग्ज किंवा नशेच्या कोणत्याही गोष्टी मिळणं हे काॅफी किंवा लॉलिपॉप मिळण्याइतकं सोपं झालं आहे. जर एक प्रथम किंवा द्वितीय वर्षातील मुलगा जर गांजाच्या डिलरला ट्रेस करू शकतो, तर पोलीस का नाही? पोलीसच मागे राहात आहेत का? असा सवाल त्याने केला.

 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://www.instagram.com/reel/C4PpYspO_re/