IIM- CAT परीक्षेसाठी हे नियम न पाळणारे विद्यार्थी अपात्र 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनौ द्वारे आयोजित CAT परीक्षा देशभरातील प्रमुख १५० शहरांमधील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जात आहे.उमेदवारांनी CAT 2023 साठी ड्रेस कोडचे पालन करणे आणि परीक्षेच्या दिवशी विहित सूचना आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

IIM- CAT परीक्षेसाठी हे नियम न पाळणारे विद्यार्थी अपात्र 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) प्रोग्राम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश पूर्व परीक्षा म्हणजेच कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT) 2023 येत्या रविवार (दि.२६ ) होणार आहे. दरवर्षी 2 लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट होतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनौ द्वारे आयोजित CAT परीक्षा देशभरातील प्रमुख १५० शहरांमधील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जात आहे.उमेदवारांनी CAT 2023 साठी ड्रेस कोडचे पालन करणे आणि परीक्षेच्या दिवशी विहित सूचना आणि नियमांचे पालन करणे आवश्यकआहे, तसे न केल्यास उमेदवार परीक्षा देण्यास अपात्र ठरू शकतात. 

हेही वाचा : SSC GD 2024 : सुरक्षा दलातील भरती परीक्षेची अधिसूचना निघाली ! अर्ज करून तयारीला लागा, अशी असेल प्रक्रिया

IIM- CAT परीक्षेला जाताना CAT प्रवेशपत्राव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांनी वैध फोटो ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. स्वीकृत कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, इलेक्टोरल आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी असलेल्या कोणत्याही सरकारी ओळख पत्राचा समावेश केला आहे. परीक्षेदरम्यान मदतीची आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांना मदतीची गरज असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रतिज्ञापत्रासह आवश्यक  कागदपत्रे आणावी लागतील. याशिवाय, विद्यार्थ्यांना CAT- 2023 परीक्षेच्या दिवशी नाव बदलण्यासाठी किंवा इतर आवश्यकतांसाठी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील.या शिवाय परीक्षेसाठी विशेष ड्रेस कोड ठरवण्यात आला आहे. उमेदवार खिसा नसलेला पुलओव्हर, स्वेटर आणि कार्डिगन्स घालू शकतात. टोपी, जॅकेट  किंवा बंद पायाचे शूज घालण्यास मनाई आहे.

CAT परीक्षा तीन वेगवेगळ्या स्लॉटमध्ये घेतली जाईल. पहिला स्लॉट सकाळी ८.३० ते १०.३० पर्यंत आहे. दुसरा स्लॉट दुपारी २.३० ते ४.३० आणि तिसरा स्लॉट दुपारी ४.३० ते  ६.३० पर्यंत आहे. यंदा एमबीए प्रवेश परीक्षेसाठी ३ लाखांहून अधिक उमेदवार बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.