कोल्हापूर विद्यापीठात भरती! मराठा आरक्षणामुळे नव्याने बिंदूनामावली सुरु.. 

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात प्राध्यापकांची एकुण ७२ पदांच्या भरती प्रक्रियेला राज्य सरकारने दिली मान्यता.

कोल्हापूर विद्यापीठात भरती! मराठा आरक्षणामुळे नव्याने बिंदूनामावली सुरु.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात (Shivaji University Kolhapur) प्राध्यापकांच्या (Faculty recruitment) एकूण ७२ पदांच्या भरती प्रक्रियेला राज्य सरकारने मान्यता दिली. मात्र, मराठा आरक्षणामुळे बिंदुनामावली (Bindunamavili due to Maratha reservation) नव्याने तयार करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया (Recruitment process) निवडणुकीनंतरच पार पडण्याची शक्यता वर्तवाली जात आहे. 

राज्यात शासनाने शिवाजी विद्यापीठात ७२ पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यापैकी सहाय्यक प्राध्यापक ६२ पदे तर सहयोगी प्राध्यापकांची १० आहेत. या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असला तरी नव्याने काही अडथळे पुढे येताना दिसत आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आणखी काही महिने भरतीची वाट पाहावी लागणार आहे. 

शिवाजी विद्यापीठाने बिंदूनामावली तयार करुन त्या संदर्भातील तपासणी अहवाल विद्यापीठ प्रशासनाने शासनाकडे पाठविला. त्यानंतर मागील महिन्यात शासनाची मान्यता मिळाली. व्यवस्थापन परिषदेने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यास मान्यता दिली. त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आली. राज्य सरकारने २० फेब्रुवारी रोजी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केले गेले. त्यामुळे या आरक्षणानुसार आता भरती प्रक्रियेसाठी बिंदूनामावली तयार करण्याचे काम विद्यापीठ प्रशासनाकडून सुरु आहे. ते पुर्ण झाले की भरती प्रक्रिया पार पडणार आहे. 

_____________________________________________________