बार्टीतर्फे विशिष्ट जातीसाठी प्रशिक्षण ; 150 विद्यार्थ्यांना देणार प्रत्येकी 5 हजार रुपये

विद्यार्थ्यांना आयबीपीएस, एलआयसी , रेल्वे , बॅंक लिपीक  व तत्सम पदांच्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

बार्टीतर्फे विशिष्ट जातीसाठी प्रशिक्षण ; 150 विद्यार्थ्यांना देणार प्रत्येकी 5 हजार रुपये

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute- BARTI ) काही विशिष्ट जातीसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बँक ,रेल्वे , एलआयसी आदी मध्ये लिपिक वर्गीय स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत निवासी प्रशिक्षण (Free residential coaching for competitive exam preparation) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

हेही वाचा : शिक्षक भरती रखडण्याचे खरे कारण आले समोर ; जाहिरातीसाठी आणखी काही दिवस थांबावे लागणार

बार्टीतर्फे राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील मांग,मातंग, मिनिमादिग ,दखनी- मांग , मांग- म्हशी, मदारी , गारुडी, राधे मांग, मांग- गारोडी, मांग-गारुडी युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोफत निवांशी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,असे बार्टीतर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

लातूर जिल्हयाकरिता विद्यार्थ्यांना आयबीपीएस, एलआयसी , रेल्वे , बॅंक लिपीक  व तत्सम पदांच्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी यशवंतराव चव्हाण समाज विकास प्रतिष्ठाणतर्फे लातूर येथे 150 विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे.इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

बार्टीतर्फे याबाबतची नियमावली प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवाराचे वय 18 ते 34 पर्यंत असावे  उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्यात 30 टक्के जागा महिलांसाठी व 4 टक्के जागा दिव्यांसाठी राखीव आहेत.प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिन्यांचा असणार आहे.निवड झालेल्या उमेदवारांना पुस्तक संचाकारिता 5 हजार रुपये एवढी रक्कम अदा करण्यात येणार आहे.