एमबीबीएस नापास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी 

परीक्षेची आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एमबीबीएस नापास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल मेडिकल कमिशनने ( National Medical Commission-NMC) २०२०-२०२१ शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या आणि परीक्षा उत्तीर्ण न होऊ शकलेल्या एमबीबीएस (MBBS) विद्यार्थ्यांना (STUDENT) परीक्षेची आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना कोविडनंतर अनेक  समस्यांचा सामना करावा लागला होता, त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आली आहे, असे  NMC कडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : Military Nursing Services : SSC मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस 2024 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू

नॅशनल मेडिकल कमिशनने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या आणि जे विद्यार्थी त्यांची पहिली व्यावसायिक एमबीबीएस पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, अशा MBBS विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची  एक अतिरिक्त संधी   (पाचवा अटेंम्प्ट ) करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आयोगाने युद्धग्रस्त युक्रेनमधील परदेशी वैद्यकीय पदवीधरांना ( FMG) एक वेळची संधी म्हणून विविध देशांमधून त्यांचे उर्वरित वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करण्याची परवानगी दिली आहे. FMG परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, अशा परदेशी वैद्यकीय पदवीधरांना नोंदणीसाठी सक्षम करण्यासाठी दोन वर्षांसाठी अनिवार्य फिरती वैद्यकीय इंटर्नशिप (CRMI) घेणे आवश्यक आहे.