यूजीसी-नेटचे वेळापत्रक जाहीर; ३१ डिसेंबरपासून परीक्षा
मूळ वेळापत्रकानुसार, MPSC ची गट-क परीक्षा ३० नोव्हेंबर २०२५ रोजी होणार होती. मात्र, त्याच दिवशी संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) इतर स्पर्धा परीक्षा आयोजित असल्याने उपकेंद्रांच्या उपलब्धतेत अडचणी येऊ नयेत म्हणून आयोगाने परीक्षेची सुधारित तारीख ४ जानेवारी २०२६ अशी जाहीर केली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (National Examination Agency) डिसेंबर २०२५ परीक्षेचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर (December 2025 exam schedule announced) केले आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. ही परीक्षा ३१ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत देशभरातील विविध केंद्रांवर संगणक-आधारित चाचणी पद्धतीने घेतली जाईल. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अर्ज दाखल करण्याची तसेच अर्ज शुल्क भरण्याची अंतिम मुदत ७ नोव्हेंबरपर्यंत (Deadline is November 7th) असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट https://ugcnet.nta.ac.in ला भेट देऊन लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इंजीनिअर तरुणांसाठी नोकरीची संधी! भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू
अर्जामध्ये काही त्रुटी किंवा चुका असल्यास त्या सुधारण्यासाठी १० ते १२ नोव्हेंबर या कालावधीत सुधारणा विंडो उपलब्ध असेल. उमेदवारांना त्यांच्या अर्जातील चुका दुरुस्त करण्याची ही शेवटची संधी मिळेल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. दोन पेपर एकाच सत्रात तीन तासांत परीक्षा केंद्रांची यादी परीक्षेच्या १० दिवस आधी एनटीएच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल ही परीक्षा संपूर्ण देशभरात ८५ विषयांसाठी कॉम्प्युटर बेस्ड पद्धतीने होईल. दोन पेपर एकाच सत्रात तीन तासांत होतील. यात ३०० गुणांसाठी १५० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
मूळ वेळापत्रकानुसार, MPSC ची गट-क परीक्षा ३० नोव्हेंबर २०२५ रोजी होणार होती. मात्र, त्याच दिवशी संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) इतर स्पर्धा परीक्षा आयोजित असल्याने उपकेंद्रांच्या उपलब्धतेत अडचणी येऊ नयेत म्हणून आयोगाने परीक्षेची सुधारित तारीख ४ जानेवारी २०२६ अशी जाहीर केली. राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) तर्फे यूजीसी-नेट डिसेंबर २०२५ परीक्षेचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, या परीक्षा ३१ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत देशभरातील विविध केंद्रांवर होणार आहेत. त्यामध्ये ४ जानेवारी रोजीची परीक्षा एमपीएससीच्या तारखेशी जुळल्याने विद्यार्थ्यांना दोन्हींपैकी एक परीक्षा निवडावी लागणार आहे.
eduvarta@gmail.com