आता क्रीडा शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे क्रीडामंत्र्यांचे आश्वासन

गेल्या दहा ते बारा वर्षांपासून कोणत्याही अनुदानित शाळेत क्रीडा शिक्षकांची नियुक्ती न झाल्याने अनेक प्रशिक्षित आणि पात्र उमेदवारांचे वय वाढत चालले आहे. बी.पी.एड आणि एम.पी.एड सारखी पदवी घेतलेले अनेक खेळाडू शासन भरती न झाल्यामुळे खासगी शाळांमध्ये केवळ अल्प मानधनावर काम करण्यास मजबूर असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. 

आता क्रीडा शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे क्रीडामंत्र्यांचे आश्वासन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

क्रीडा शिक्षकांसाठी खुशखबर,महाराष्ट्राने खेलो इंडिया स्पर्धेत देशात दुसरे स्थान मिळवूनही, राज्यातील क्रीडा शिक्षक (Sports teacher) आजही रोजंदारीवर काम करण्याची वेळ आलेली आहे. पात्र खेळाडू घडवणाऱ्या या शिक्षकांच्या रिक्त जागा भरती (Vacancy recruitment) न झाल्याने संपूर्ण क्रीडा क्षेत्रावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Sports Minister Manikrao Kokate) यांनी क्रीडा शिक्षकांच्या पदभरतीची प्रक्रिया  (Recruitment process) लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. २५१ विद्यार्थ्यांमागे एक क्रीडा शिक्षक (One sports teacher for every 251 students) नेमण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यूजीसी-नेटचे वेळापत्रक जाहीर; ३१ डिसेंबरपासून परीक्षा

गेल्या दहा ते बारा वर्षांपासून कोणत्याही अनुदानित शाळेत क्रीडा शिक्षकांची नियुक्ती न झाल्याने अनेक प्रशिक्षित आणि पात्र उमेदवारांचे वय वाढत चालले आहे. बी.पी.एड आणि एम.पी.एड सारखी पदवी घेतलेले अनेक खेळाडू शासन भरती न झाल्यामुळे खासगी शाळांमध्ये केवळ अल्प मानधनावर काम करण्यास मजबूर असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. 

क्रीडा शिक्षकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच क्रीडामंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यावेळी मंत्री कोकाटे म्हणाले की, क्रीडा शिक्षक हा खेळाडू तयार करण्याचा कणा आहे आणि सरकारला त्यांच्या योगदानाचा मान आहे. वित्त विभागाशी चर्चा करून रिक्त पदांच्या भरतीला लवकर अंतिम स्वरूप देण्यात येईल, असेही त्यांनी आश्वासन दिले.

खेलो इंडिया सारख्या स्पर्धांमध्ये उत्तुंग कामगिरी करण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची गरज अधोरेखित होत असताना, राज्यातील क्रीडा शिक्षकांच्या भरतीचा प्रश्न आता लवकर मार्गी लागणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.