CUET-UG 2024 : ऑनलाइन अर्ज भरण्यास अखेरच्या क्षणी मुदतवाढ

उमेदवार व पालक यांच्या मागणीनुसार ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

CUET-UG 2024 : ऑनलाइन अर्ज भरण्यास  अखेरच्या क्षणी मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी (CUET UG 2024) कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अखेरच्या क्षणी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. उमेदवार व पालक यांच्या मागणीनुसार ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ (Extension till March 31) देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी अर्ज भरला नाही; त्यांना अधिकृत संकेतस्थळ exams.nta.ac.in/CUET-UG/ वर जाऊन अर्ज सबमिट करता येणार आहे.  

परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सूचना नीट वाचणे आवश्यक आहे. CUET UG 2024 ची नोंदणीसह अर्ज 31 मार्च रोजी रात्री 09:50 वाजेपर्यंत भरता येईल. तुम्ही क्रेडिट/डेबिट कार्ड/नेट बँकिंग/UPI द्वारे परीक्षा शुल्क भरू शकता. त्यानंतर 1 ते 3 एप्रिल दरम्यान एक दुरुस्ती विंडो प्रदान केली जाईल. 

NTA अधिकृत अधिसूचनेनुसार, विद्यार्थी 1 एप्रिल ते 3 एप्रिल (रात्री 11:50 पर्यंत) तपशील दुरुस्त करू शकतात. यानंतर, CUET UG 2024 प्रवेशपत्रे मे 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात जारी केली जातील. परीक्षा 15 मे पासून सुरू होईल आणि 31 मे पर्यंत चालेल. उत्तर की प्रदर्शित करण्याची तारीख NTA द्वारे नंतर कळवली जाईल. CUET UG 2024 चे तात्पुरते निकाल 30 जून रोजी वेबसाइटवर जाहीर होणार आहेत. 

सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी 400 रुपये आणि 3 विषयांसाठी 1000 रुपये, OBC/ EWS मधील विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी 375 रुपये तर 3 विषयांसाठी उमेदवारांना 900 रुपये भरावे लागतील. SC/ST/PwBD/ तृतीय लिंगातील प्रत्येक विषयासाठी 350 रुपये तर 3 विषयांसाठी 800 रुपये भरावे लागतील.