प्रतीक्षा संपली विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला सुरूवात ; १ जानेवारीपासून करता येणार अर्ज  

111 पदांच्या भरती प्रक्रियेला १ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे.

प्रतीक्षा संपली विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला सुरूवात ; १ जानेवारीपासून करता येणार अर्ज  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) विविध विभागामधील प्राध्यापकांच्या रिक्त असलेल्या 111 पदांच्या भरती प्रक्रियेला (recruitment of university professors नवीन वर्षात म्हणजेच येत्या एक जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. विद्यापीठातर्फे शनिवारी रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. विद्यापीठाच्या recruitment.unipune.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

ऑक्सफर्ड ऑफ दी इस्ट अशी ओळख असणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुमारे 50 टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत.त्यामुळे विद्यापीठाच्या शिक्षणिक गुणवत्तेवर त्याचा कमी अधिक प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.मात्र,राज्य शासनाकडून प्राध्यापक भरातीला मान्यता मिळाल्यामुळे विद्यापीठाने भरती प्रक्रियेला उशीरा का होईना सुरूवात केली आहे.इच्छुक उमेदवारांना येत्या १ जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जानेवारी आहे. 

विद्यापीठात काही महिन्यांपूर्वी कंत्राटी प्राध्यापकांची पदे भरण्यात आली.आता पूर्णवेळ अनुदानित पदावरील रिक्त जागांवरील पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.त्यामुळे विद्यापीठातील विभागात प्राध्यापक म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी प्राप्त होणार आहे.त्यातच प्राध्यापक भरतीमध्ये कोणतीही त्रुटी निर्माण होऊ नये, या दृष्टीने विद्यापीठाने खबरदारी घ्यावी अशी मागणी विद्यापीठाच्या अधिसभेत काही सदस्यांनी केली होती.त्यामुळे भरती प्रक्रिया सुरळीत राबावण्याचे मोठे आव्हान विद्यापीठ प्रशासनासमोर असणार आहे.


--------------