देशात १० वी मध्ये शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या धक्कादायक

देशात अजूनही १० वी मध्ये शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या धक्कादायक आहे.

देशात १० वी मध्ये शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या धक्कादायक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

देशात प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी मिळावी म्हणून केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रयत्न होत असताना देशात अजूनही १० वी मध्ये शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या धक्कादायक आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी लोकसभेत प्रसिध्द केलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पर्यंत, इयत्ता १० मधील गळतीचे प्रमाण २०.६ टक्के आहे. २०२२ मध्ये १ कोटी, ८९ लाख, ९० हजार, ८०९ विद्यार्थी इयत्ता १०वी मध्ये गेले होते. 

मात्र,  २९ लाख, ५६ हजार, १३८ विद्यार्थ्यांनी १० वी मध्ये शाळा सोडली. यामध्ये ओरिसा आणि बिहार (Bihar) या राज्यातील आकडेवारी सर्वाधिक आहे. या राज्यांमध्ये विद्यार्थी गळतीचे प्रमाण खूप जास्त आहे. लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात प्रधान यांनी ही माहिती दिली. परंतु, मागील वर्षांच्या तुलनेत ही संख्या कमी झाली आहे. २०१८-१९ मध्ये ही संख्या २८.४ टक्के इतकी होती. या बाबतीत सर्वात वाईट स्थिती असलेल्या राज्यांमध्ये ओरिसा पहिल्या क्रमांकावर आहे.येथील विद्यार्थी (Students) गळतीचे प्रमाण ४९.९ टक्के इतके नोंदवले गेले. याचा अर्थ दहावीत येणारे जवळपास निम्मे विद्यार्थी आपला अभ्यास अर्धवट सोडतात. तर बिहार दुसऱ्या क्रमांकावर आहे जेथे गळतीचे प्रमाण ४२.१ टक्के आहे. या व्यतिरिक्त, मेघालय (३३. ५ टक्के), कर्नाटक (२८. ५ टक्के), आंध्र प्रदेश आणि आसाम प्रत्येकी २८.३ टक्के, गुजरात (२८.२ टक्के) आणि तेलंगणा (२७.४ टक्के) उच्च गळती असलेली इतर राज्ये आहेत. 

हेही वाचा : अनधिकृत शाळेला शिक्षणाधिकारीच जबाबदार ; शासनाकडून कारवाईचा बडगा  

तर गळतीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश (९.२ टक्के), त्रिपुरा (३.८ टक्के), तामिळनाडू (९ टक्के), मणिपूर, मध्य प्रदेश (९.८ टक्के), हिमाचल प्रदेश (२.५ टक्के), हरियाणामध्ये गळतीचे प्रमाण नाही. (७.४ टक्के) आणि दिल्ली (१.३ टक्के) इतकी आहे.मात्र, महाराष्ट्राची आकडेवारी प्राप्त झाली नाही. 

S