पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची शाळेला दांडी

पहिल्या दिवशी शनिवार, दुसऱ्या दिवशी रविवार आणि सोमवारी बकरी ईदची सुट्टी आल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असल्याचं दिसून आले.

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची शाळेला दांडी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

उन्हाळी सुट्टी (summer vacation) संपल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर शनिवारी (दि. १५) शाळेची पहिली घंटा (school First day) वाजली. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीच्या माध्यमिक आणि प्राथमिक शाळेचा पहिलाच दिवस (First day of secondary and primary school)होता. शासन आदेशानुसार पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणूज साजरा केला जातो.परंतु, पहिल्या दिवशी शनिवार, दुसऱ्या दिवशी रविवार आणि सोमवारी बकरी ईदची सुट्टी आल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी (Low attendance of students) असल्याचं दिसून आले. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

ज्या विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली होती. त्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सवाची धूम बघायला मिळाली. शिक्षकांसह शालेय समितीतील पदाधिकार्‍यांनी शाळेत पाऊल ठेवणार्‍या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले.  तर कुठे शाळेतील वर्ग, फळा सजवलेला पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप देखील करण्यात आले. याशिवाय शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणून वर्गात बाकावर बसून आपल्या जुन्या-नव्या मित्र-मैत्रिणींबरोबर मजा मस्ती केली. 

दरम्यान, मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांचीही शाळांच्या परिसरात गर्दी जमलेली पाहायला मिळाली. शाळेचा परिसर रांगोळी, फुग्यांच्या साहाय्याने सजविण्यात आला होता. तसेच अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नवीन करकरीत पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली. नवीकोरी पुस्तके मिळाल्याने मुलांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.