युजीसी नेट जून 2024 परीक्षेचे हॉल तिकिट प्रसिद्ध

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

युजीसी नेट जून 2024 परीक्षेचे हॉल तिकिट प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) जून 2024 मध्ये बसण्यासाठी आवश्यक असलेले हॉल तिकिट (Halltickets) नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे जारी करण्यात आली आहेत. NTA ugcnet.nta.ac.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्जदार(candidates) त्यांचे हॉल तिकिट त्वरित डाउनलोड करू शकतात.

हॉल तिकिट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला लॉगिनची माहिती भरावी लागेल. हॉल तिकिट डाउनलोड केल्यानंतर, उमेदवारांनी त्यात दिलेले सर्व तपशील योग्यरित्या तपासावेत.हॉल तिकिटामध्ये काही त्रुटी आढळल्यास, उमेदवार हेल्पलाइन क्रमांक 011- 40759000 वर किंवा ugcnet@nta.ac.in या ई-मेलद्वारे संपर्क साधू शकतात.  

असे करा प्रवेशपत्र डाउनलोड

हॉल तिकिट डाउनलोड करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in ला भेट द्या. वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला UGC NET जून 2024 या लिंकवर क्लिक करावे लागेल. ताज्या बातम्यांमध्ये हॉल तिकिट डाउनलोड करण्यासाठी दिलेल्या पर्यायावर क्लिक करावे. आता पुढील पृष्ठावर तुम्हाला अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि दिलेली सुरक्षा पिन टाकावी लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल. आता तुमचे हॉल तिकिट स्क्रीनवर उघडेल जिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता.