MHT CET 2023 : प्रवेशपत्र कधी मिळणार? तारखांच्या घोळाने विद्यार्थी संभ्रमात

MHT CET ची नोंदणी ८ ते १५ एप्रिल दरम्यान झाली होती. आज म्हणजे २ मे रोजी प्रवेशपत्र जारी केले जातील, असा अंदाज लावण्यात येत होता.

MHT CET 2023 : प्रवेशपत्र कधी मिळणार? तारखांच्या घोळाने विद्यार्थी संभ्रमात
MHT CET 2023 Admit Card

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET 2023) चे प्रवेशपत्र मंगळवारी प्रसिद्ध होईल, अशी माहिती समोर आली होती. पण अद्याप MHT CET च्या अधिकृत वेबसाईटवर प्रवेशपत्राबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्याच्या वेगवेगळ्या तारखा सांगण्यात येत असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

MHT CET ची नोंदणी ८ ते १५ एप्रिल दरम्यान झाली होती. आज म्हणजे २ मे रोजी प्रवेशपत्र जारी केले जातील, असा अंदाज लावण्यात येत होता. दरम्यान, सोशल मीडियावर ३ मे  आणि ५ मे रोजी प्रवेशपत्र प्रसिद्ध केले जाईल, अशी माहिती व्हायरल होत आहे. काही प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. पण त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

हेही वाचा : NEET UG 2023 : कशी असेल यावर्षीची परीक्षा; जाणून घ्या ऐका क्लिकवर...

महाराष्ट्र सीईटी परीक्षा संगणकावर आधारित असल्यामुळे ती ऑन लाईन होणार आहे. PCM ग्रुप साठी ही प्रवेश परीक्षा ९ ते १३ मे दरम्यान होणार आहे तर PCB ग्रुप साठी ही परीक्षा १५ ते २० मे च्या दरम्यान होणार आहे. प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्रासह परीक्षांच्या तारखा, विषय, वेळ आदी माहिती असते. त्यामध्ये काही चुका असल्यास विद्यार्थी परीक्षेला मुकले जाऊ शकतात. त्यामुळे प्रवेशपत्र लवकर मिळाल्यास चुका दुरूस्त करणे किंवा त्याबाबत सीईटी सेलशी संपर्क साधून त्यातून मार्ग काढता येऊ शकतो.

आता परीक्षेसाठी केवळा सात दिवस बाकी आहेत. अजूनही प्रवेशपत्र कधी मिळणार याबाबत काहीच माहिती उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. दरम्यान, याबाबत तारीख जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना MHT CET 2023 चे प्रवेशपत्र cetcell.mahacet.org वर डाउनलोड करता येईल.  MHT CET लॉगिन क्रेडेन्शियल टाकून MHT CET प्रवेशपत्र डाउनलोड केले जाऊ शकते. ज्या उमेदवारांनी अर्ज यशस्वीरित्या सबमिट केला आहे ते www.mahacet.org 2023 वर MHT CET हॉल तिकी डाउनलोड करू शकतील.