देशातील १५ राज्यांमध्ये ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांचे शिक्षण

सुरुवातीच्या टप्प्यात उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश यांच्याशी बोलणी सुरू आहेत, अशी माहिती केंब्रिज एज्युकेशन लॅबचे सीईओ सुयश भट्ट यांनी दिली आहे. 

देशातील १५ राज्यांमध्ये ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांचे शिक्षण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NEP 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत (NEP) देशात परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस (foreign university campus) उघडण्यासाठी भारताने या आधीच प्रयत्न सुरू केले आहेत.याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून देशातील १५ राज्यांमध्ये ऑक्सफर्ड आणि केंब्रिज (Oxford and Cambridge in 15 states) या परदेशी विद्यापीठांचे शिक्षण (teaching at foreign universities) देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश (Uttarakhand and Uttar Pradesh) यांच्याशी बोलणी सुरू आहेत, अशी माहिती केंब्रिज एज्युकेशन लॅबचे सीईओ सुयश भट्ट (Cambridge Education Lab CEO Suyash Bhatt) यांनी दिली आहे. 

भट्ट म्हणाले की, " आम्हाला केंब्रिज आणि ऑक्सफर्डसारख्या प्रसिद्ध विद्यापीठांचे शिक्षण भारतात आणायच्या आहेत.त्यासाठी  आम्ही अनेक वर्षांपासून या विद्यापीठांसोबत काम करत आहोत. यावर्षी भारतातील २५-३० शाळांना या विद्यापीठांमध्ये आमंत्रित केले होते.तर ३० शाळा ऑनलाइन पध्दतीने जोडल्या गेल्या आहेत.केंब्रिज एज्युकेशन लॅबच्या अहवालानुसार भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अनेक बदलांची गरज आहे. यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडेही पाठवण्यात आला आहे.आम्ही तेथील प्राध्यापक आणि भारतीय शिक्षकांसोबत अनेक प्रशिक्षण कार्यक्रम केले आहेत. बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची आमची योजना आहे.

हेही वाचा : प्राध्यापक भरतीनंतरच विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन

 दरम्यान काही दिवसांपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ऑक्सफर्ड, केंब्रिज युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) सारख्या ब्रिटनच्या जगप्रसिद्ध टॉप-10 संस्थांच्या शाखा भारतात सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. तसेच  येत्या दोन वर्षांत ब्रिटनमध्ये भारतीय आयआयटीचे ऑफशोर कॅम्पसही उघडले जाणार आहेत. ब्रिटन हा पहिला युरोपीय देश असेल जिथे आयआयटी कॅम्पस सुरू होतील. तथापि, भारत सरकारची ब्रिटनसह सात देशांमध्ये आयआयटी कॅम्पस उघडण्याची योजना आहे.