मुलांची झोप होण्यासाठी शाळेच्या वेळा बदलण्याचा विचार करा : रमेश बैस

शिक्षण हे आनंददायी व्हावे ; यासाठी गृहापाठावर कमी जोर द्यावा. शाळेत अभ्यासाबरोबरच खेळ व इतर उपक्रमांवर अधिक लक्ष द्यावे.

मुलांची झोप होण्यासाठी शाळेच्या वेळा बदलण्याचा विचार करा : रमेश बैस

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अलीकडच्या काळात सर्वांच्याच झोपेचे तास बदलले आहेत.लवकर झोपावे लवकर उठावे ,असे बोलले जात होते. मात्र आता मुलं रात्री उशीरापर्यंत जागी असतात. पण शाळा असल्यामुळे त्यांना लवकर उठावे लागते. परिणामी त्यांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी (Officials in the education department) शाळेच्या वेळेत बदल करण्याचा विचार करावा (should consider changing the school timing) ज्यामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होऊ शकेल. तसेच शिक्षण हे आनंददायी (teaching is fun) व्हावे ; यासाठी गृहापाठावर कमी जोर द्यावा. शाळेत अभ्यासाबरोबरच खेळ व इतर उपक्रमांवर अधिक लक्ष द्यावे,असे मत राज्याच्या शिक्षण विभागातर्फे (education department) आयोजित कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी मंगळवारी व्यक्त केले.

हेही वाचा : Podar International School : ‘आरटीई’ प्रवेशातून ५३ पालकांची फसवणूक

 राज्य शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या ' मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या उपक्रमाच्या मुंबई येथे झालेल्या उद्घाटन प्रसंगी रमेश बैस बोलत होते. कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा , शालेय शिक्षण विभागाचे सचिव रंजीतसिंह देओल, राज्याचे शिक्षण आयुक्त सुराज मांढरे आदी उपस्थित होते.

बैस म्हणाले, काही वेळा दप्तरांचे ओझे हे मुलांच्या वाजनापेक्षा जास्त असते.परंतु, मुलांना शाळेत दप्तर घेऊन जाण्याची गरज भासणार नाही,अशी पुस्तक फ्री शाळा असावी. मुलांनी  पुस्तके शाळेतच ठेववीत,असे प्रयोग काही ठिकाणी झाले आहेत.मुलांना शाळेत जावेसे वाटावे,असे वातावरण तयार व्हावे.काही मुलांच्या सवयी, विचार वेगवेगळे असतात.त्यानुसार त्यांच्याशी संवाद ठेवावा.बदलत्या काळानुसार शाळांमध्ये सुध्दा बदल झाले पाहिजेत.मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी,यासाठी नवीन उपक्रम राबवले जात आहेत. ही चांगली बाब आहे.पण मुले ही मोबाईलवर जास्त काला घालवतात.त्यामुळे ऑडिओ,व्हिडिओ स्वरूपातील पुस्तके देण्याचा विचार करावा.

राज्यातील ग्रंथालयांचे पुनर्जीवन केले पाहिजे.त्यात नवीन साहित्य ठेवणे गरजेचे आहे.ग्रंथालय दत्तक घेण्याच्या योजनेला प्रोत्साहन द्यालया हवे. इंटरनेट सुविधा देऊन सर्व ग्रंथालयांचा कायापालट करण्याची आवश्यकता आहे.तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे.महाराष्ट्रात अनेक भाषा व बोली बोलल्या जातात. या बोलीमध्ये सुध्दा पुस्तके तयार करण्याचे काम हाती घ्यावे,असाही सल्ला बैस यांनी दिला.